राज्यातील मेगा भरती अडचणीत; कंत्राटी कर्मचाऱ्यांच्या याचिकेची हायकोर्टाकडून दखल

उच्च न्यायालयात आज होणार सुनावणी

मुंबई: राज्यात मेगा भरती करण्यापूर्वी कंत्राटी कर्मचाऱ्यांना कायम करा. मग मेगा भरती करायला परवानगी द्या, अशी विनंती करणाऱ्या याचिकेची उच्च न्यायालयाने आज दखल घेतली आहे. या याचिकेवर उद्या तातडीने सुनावणी घेण्याचा निर्णय घेतला आहे. मराठा आरक्षणाला विरोध आणि सपोर्ट करणाऱ्या दाखल झालेल्या याचिकेंच्या सुनावणीबरोबर या याचिकेची एकत्रीत सुनावणी होण्याची शक्‍यता आहे. यामुळे मेगा भरती होण्यात अडचण येण्याची शक्‍यता आहे.

राज्य सरकारने मे-2018मध्ये मेगा भरती आणि डिसेंबर 2018मध्ये सेवानिवृत्त झालेल्या अधिकाऱ्यांना पुन्हा अकरा महिने कंत्राटी नेमणूक करण्याचा निर्णय घेत अध्यादेशही जारी केले. या दोन्ही अध्यादेशांना महाराष्ट्र राज्य कंत्राटी कर्मचारी महासंघाचे अध्यक्ष मुकुंद जादवड यांच्या वतीने ऍड. महादेव चौधरी यांनी उच्च न्यायालयात याचिका दाखल करून आव्हान दिले आहे. या याचिकेवर मुख्य न्यायमूर्ती नरेश पाटील आणि न्यायमूर्ती एम. एस. कर्णिक यांच्या खंडपीठासमोर आज प्राथमिक सुनावणी झाली.

यावेळी ऍड. महादेव चौधरी यांनी राज्य सरकारने मराठा समाजाला आरक्षण देण्यापूर्वी राज्यात मेगा नोकर भरती करण्याचा निर्णय घेतला. तसा अध्यादेश मे-2018मध्ये काढला. दरम्यान, मराठा आरक्षणाच्या मुद्यावर या मेगा भरतीला अडचणी निर्माण होत असल्याने सेवा निवृत्त अधिकाऱ्यांना अकरा महिन्याच्या कंत्राटी पध्दतीने नियुक्त करण्याचा अध्यादेश 11 डिसेंबर 2018 रोजी काढला. मेगा आणि सेवानिवृत्त कर्मचाऱ्यांची कंत्राटी भरती ही बाहेरच्या एजन्सीमार्फत सुरू केली आहे, असा आरोप केला.

तसेच राज्यात यापूर्वी 1 ते 20 वर्षे कंत्राटी कर्मचारी म्हणून सुमारे दोन ते तीन लाख कर्मचारी काम करत आहेत. त्यात मराठा समाजाच्या तरूणांचाही समावेश आहे. याकडे न्यायालयाचे लक्ष वेधले. या कंत्राटी कर्मचाऱ्यांना आधी नोकरीत कायम करण्याचे आदेश द्या. त्यानंतर मेगा भरती करण्याचे आदेश द्या. तसेच राज्य सरकारचे नोकर भरतीचे दोन्ही अध्यादेश रद्द करा, अशी विनंती याचिकेत केली आहे.


‘प्रभात’चे फेसबुक पेज लाईक करा

What is your reaction?
3 :thumbsup:
0 :heart:
0 :joy:
0 :heart_eyes:
1 :blush:
0 :cry:
0 :rage:

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)