राज्यातील मेगाभरती फेब्रुवारीपासून

पदे भरण्याच्या हालचालींना वेग : मुख्य सचिवांनी घेतला आढावा

मुंबई: मराठा आरक्षणाचा मार्ग मोकळा झाल्यानंतर सरकारी कार्यालयातील 72 हजार पदे भरण्याच्या हालचालींना आता वेग आला आहे. पुढील आठवड्यात या मेगाभरतीची जाहिरात दिली जाणार असून फेब्रुवारी महिन्यात विविध रिक्त पदांसाठी परिक्षा घेतली जाणार आहे. नोकर भरतीमुळे मराठा समाजातील मुलांना विविध विभागात आरक्षणाच्या माध्यमातून सरकारी नोकरी मिळण्याचा मार्ग मोकळा झाला आहे.

कोणत्या खात्यात किती जागा?
आरोग्य खाते – 10,568
गृह खाते – 7,111
ग्रामविकास खाते – 11,000
कृषी खाते – 2500
सार्वजनिक बांधकाम खाते – 8,337
नगरविकास खाते – 1500
जलसंपदा खाते – 8227
जलसंधारण खाते – 2,423
पशुसंवर्धन खाते – 1,047

ही तर मिनीभरती…
ही मेगाभरती नसून मिनीभरती असल्याचा दावा राज्य सरकारी कर्मचाऱ्यांच्या केली आहे. राज्यात तब्बल एक लाख 80 हजार पदे रिक्त आहेत. त्यापैकी केवळ दोन वर्षांत 72 हजार जागा भरणे म्हणजे केवळ अनुशेष वाढवणे आहे. कारण, दरवर्षी तब्बल 50 हजार कर्मचारी निवृत्त होतात. म्हणजे दोन वर्षात 72 हजार पदे भरुनही 28 हजाराचा अनुशेष कायम राहील. तसेच मराठा समाजासाठी सरकार 72 हजारांपैकी 16 टक्के जागा रिक्त ठेवणार होते. म्हणजे प्रत्यक्षात दोन वर्षांत 60 हजार जागाच भरल्या जाणार होत्या. ज्या मागणीच्या प्रमाणात कमी आहेत, असे स्पष्ट करण्यात आले.

मुंबईत नुकतेच संपलेल्या हिवाळी अधिवेशनात (29 नोव्हेंबर) मराठा समाजाला आरक्षण देणारे ऐतिहासिक विधेयक मंजूर करण्यात आले. मराठा समाजाला आरक्षण देणारे विधेयक मंजूर होऊन चोवीस तासही होत नाही तोच मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी अधिवेशनाच्या शेवटच्या दिवशी सरकारी सेवेतील 72 हजार पदे भरणारी मेगाभरती करणार असल्याची घोषणा विधानसभेत केली. ही मेगाभरती तात्काळ करणार असल्याचे त्यांनी स्पष्ट केले.

यापार्श्वभूमिवर कृषी, महसूल, ग्रामविकास, आरोग्य, वने या विभागांची क्षेत्रियस्तरावरील सुमारे 72 हजार पदे भरण्यासाठी आवश्‍यक त्या कार्यवाहीकरिता आज मुख्य सचिवांच्या अध्यक्षतेखाली मंत्रालयात सचिव गटाच्या बैठकीत आढावा घेण्यात आला. मुख्य सचिव दिनेश कुमार जैन यांच्या अध्यक्षतेखाली करण्यात आलेल्या सचिव गटामध्ये सामान्य प्रशासन, आरोग्य, ग्रामविकास, माहिती तंत्रज्ञान, महसूल, पाणी पुरवठा, वने या विभागाचे सचिव सदस्य आहेत. मुख्य सचिवांमार्फत दररोज पदभरतीच्या प्रक्रियेबाबत आढावा घेतला जात आहे.

या पदांमध्ये ग्रामीण भागात क्षेत्रियस्तरावर काम करणाऱ्या विविध संवर्गातील पदांचा समावेश असून भरती प्रक्रिया व्यवस्थित आणि लवकर होण्याकरिता नियोजन केले जात आहे. सध्या बिंदू नामावली तपासणीचे काम सुरु असून त्यानंतर या पदांसाठी जाहिराती प्रसिद्ध होणार आहेत, असे मुख्य सचिवांनी सांगितले.


‘प्रभात’चे फेसबुक पेज लाईक करा

What is your reaction?
0 :thumbsup:
0 :heart:
0 :joy:
0 :heart_eyes:
0 :blush:
1 :cry:
0 :rage:

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)