बोलणी निष्फळ, गुरुवारीही शाळा बंदच 

सुनिल गाडगे : शिक्षक भारती,सर्व घटक संघटनांची अर्थमंत्र्यांच्या दालनात बैठक 

नगर – राज्य सरकारी,निमसरकारी कर्मचारी व महाराष्ट्र राज्य शिक्षक भारती संघटना तसेच शिक्षक संघटना समन्वय समितची व सर्व घटक संघटनांच्या राज्य भरातील पदाधिकाऱ्यांची बैठक काल वित्त व नियोजन मंत्री सुधीर मुनगंटीवार व संपकरी राज्य सरकारी कर्मचाऱ्यांचे नेते तसेच शिक्षक भारतीचे नेते सुभाष मोरे, सुनिल गाडगे यांच्यात बुधवारी झालेल्या चर्चेत तोडगा निघाला नाही. त्यामुळे गुरुवारीही संप सुरूच राहिला. यापुढील काळात बेमुदत संपाची हाक देण्याची वेळ सरकार आणत आहे. अशी माहिती शिक्षक भारती संघटनेचे नेते सुनिल गाडगे यांनी दिली.वाटाघाटी फिसकटल्याने आजही शाळांचे कामकाज ठप्पच होते.

-Ads-
दैनिक प्रभातचे फेसबुक पेज लाईक करा

मुंबईत झालेल्या बैठकीत सातवा वेतन आयोग नोव्हेंबरपासून लागू करताना तो वेतन निश्‍चितीसह (पे फिक्‍सेशन) द्यावा, जानेवारी 2018 मध्ये केंद्राने दिलेली महागाई भत्त्याची वाढ मिळालेली नाही. त्यासाठी वाढीव 600 कोटींची तरतूद करावी व 14 महिन्यांची थकबाकी गणेशोत्सवापूर्वी तर जानेवारीची थकबाकी दिवाळीपूर्वी द्यावी, अशी मागणी सुनिल गाडगे यांनी अर्थमंत्री सुधीर मुनगंटीवार यांच्याकडे केली. त्यावर नोव्हेंबर मध्ये वेतन आयोग लागु केला जाईल असे फक्त अश्‍वासन वित्त मंत्र्यांनी दिले. कोणताही ठोस निर्णय वित्त मंत्र्यांनी दिलाच नाही.

अर्थमंत्र्यांच्या सुचनेवरुन शिक्षक भारतीचे अध्यक्ष अशोक बेलसरे, शक्षक भारतीचे नेते सुनिल गाडगे, कार्याध्यक्ष आप्पासाहेब जगताप,हनुमंत रायकर, सुदाम दिघे, विजय लंके, सुनिल जाधव, शरद धोत्रे,जिल्हाध्यक्ष बाबासाहेब लोंढे, जिल्हा सचिव मोहम्मद समी शेख, संभाजी चौधरी, शहर जिल्हाध्यक्ष प्रदिप रुपटक्के, उच्च माध्यमिक विभागाचे जिल्हाध्यक्ष जितेंद्र आरु, जिल्हा सचिव महेश पाडेकर, कार्याध्यक्ष किशोर डोंगरे, जिल्हा महिला अध्यक्षा आशा मगर, सचिव विभावरी रोकडे, संध्या गावडे, कार्याध्यक्ष मिनाक्षी सुर्यवंशी, संगिता भालेराव, जयमाला भोरे, शकुंतला वाळुंज, छाया लष्करे, जया गागरे, सुरेखा काळे, लता पठारे, बेबीनंदा लांडे, संगिता धराडे, सविता शितोळे, नौशाद शेख, शारदा लोंढे, साधना शिंदे, अशोक धनवडे, जॉन सोनवणे, श्रीकांत गाडगे, नवनाथ घोरपडे, काशिनाथ मते आदींनी मुख्य सचिव दिनेशकुमार जैन यांची भेट घेतली. अर्धा तास चर्चा चालली, या चर्चेतुनही शिक्षकांचे प्रश्‍न सुटले नाहीत.

सरकारला शिक्षकांचे प्रश्‍न सोडविण्याची इच्छाशक्ती नाही त्यामुळे शिक्षक भारती मुख्य सचिवांच्या दालनातुनही बाहेर पडली. तिथेही ठोस आश्‍वासन मिळाले नाही. यापुढे प्रश्‍न सुटलेच नाहीत व सरकारला ती सोडविण्याची इच्छाशक्तीच नसेल तर राज्यभर पुन्हा राज्यव्यापी संपाची हाक द्यावी लागेल, असेही शिक्षक नेते सुनिल गाडगे यांनी सांगितले.


‘प्रभात’चे फेसबुक पेज लाईक करा

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)