मोदी-पुतीन यांच्यात एससीओ परिषदेदरम्यान बैठक

नवी दिल्ली- किरगीझस्तानची राजधानी बिश्‍केक इथे आज शांघाय सहकार्य संघटनेच्या (एससीओ) परिषदे निमित्त पंतप्रधान नरेंद्र मोदी आज दुपारी बिश्‍केकमध्ये पोहचेल आहेत. दरम्यान, परिषदेनिमित्त पंतप्रधान मोदी आणि रशियाचे अध्यक्ष व्लादिमीर पुतिन व चीनचे अध्यक्ष शी जिनपिंग यांच्यात एक महत्वपूर्ण बैठक पारपडली आहे.

रशियाच्या अध्यक्ष्यांसोबत झालेल्या बैठकीमध्ये पंतप्रधान मोदींनी अमेठीमध्ये रायफल फॅक्टरी उभारण्यात रशियाचे अध्यक्ष व्लादिमीर पुतिन यांनी केलेल्या सहकार्याबद्दल त्यांचे आभार मानले.

या बैठकीदरम्यान पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना रशियाचे अध्यक्ष व्लादिमीर पुतिन यांनी व्लादिवोस्तोक येथे होणाऱ्या इस्टर्न इकॉनॉमिक फोरमसाठी प्रमुख अतिथी म्हणून निमंत्रण दिले असून या निमंत्रणाचा पंतप्रधान मोदींनी स्वीकार केला आहे. अशी माहिती भारताचे परराष्ट्र सचिव विजय गोखले यांनी दिली आहे.

https://twitter.com/ANI/status/1139155516385456129

Ads

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)