मेरठ ते प्रयागराज, जगातील सर्वात मोठा गंगा एक्‍स्प्रेस वे बनवणार : योगी आदित्यनाथ

File photo

प्रयागराज (उत्तर प्रदेश) : मेरठ ते प्रयागराज असा सुमारे 600 किमी लांबीचा गंगा एक्‍स्प्रेस-वे बनवण्यात येणार असल्याचे उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांनी जाहीर केले आहे. सुमारे 600 किमी लांबीचा हा एक्‍स्प्रेसवे जगातील सर्वात मोठा एक्‍स्प्रेस वे असणार आहे.त्याच्या निर्मितीसाठी 36 हजार कोटी रुपये खर्च येणार असल्याची माहिती त्यांनी दिली आहे.
या काळात गंगासफाईचे काम केल्याबद्दल योगी आदित्यनाथ यांनी पंतप्रधान नरेंद्र नोदींचे आभर मानले आहेत.

हा गंगा एक्‍प्रेसवे मेरठ-अमरोहा-बुलंदशहर-बदायूं-शाहजांहपूर-फारूखाबाद-हरदोई-कनोज-उन्नाव-रायबरेली-प्रतापगडमार्गे प्रयागराजला जाणार आहे. पूर्ण झाल्यानंतर हा जगातील सर्वात मोठा एक्‍प्रेस वे बनणार आहे. असेही योगी आदित्यनाथ यांनी स्पष्ट केले. त्यासाठी 6556 हेक्‍टर जमीन लागणार आहे. सुरुवातीला चार पदरी असणारा हा एक्‍स्प्रेस वे प्रथम चार पदरी नंतर सहा पदरी बनवण्यात येणार आहे. 29 जानेवारीला मंत्रिमंडळाची बैठक झाल्यानंतर मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ आणि त्यांचे संपूर्ण मंत्रिमंडळ गंगास्नानानंतर 450 वर्षांनंतर खोलण्यात आलेल्या अक्षयवट आणि सरस्वती कूप यांचे दर्शन घेणार आहे.

-Ads-
दैनिक प्रभातचे फेसबुक पेज लाईक करा

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)