साहित्यविश्‍व: मीना प्रभू

व्यंकटेश लिंबकर

प्रवासवर्णन हा आजही मराठी साहित्याने पुरेसा न हाताळलेला विषय. पुलंचे अपूर्वाई’, जावे त्यांच्या देशा’ किंवा गोडसे भटजींचे माझा प्रवास’ असे सन्माननीय अपवाद वगळले, तर जगभरातल्या विविध ठिकाणांचे प्रवासवर्णन करणारी पुस्तके मराठीत खूपच कमी आहेत; पण गेल्या 23 वर्षांपासून लंडन, न्यूयॉर्क, रोम, इराण, चीन, तिबेट अशा अनेक देशांना भेटी देऊन त्या अनुभवाला शब्दबद्ध करणाऱ्या मीना प्रभू यांनी या साहित्य प्रकाराला आजही ताजेतवाने ठेवले आहे. तब्बल 12 पुस्तकांच्या लिखाणानंतरही मीनाताईंची ही लेखनमुशाफिरी अजूनही सुरूच आहे.

-Ads-
दैनिक प्रभातचे फेसबुक पेज लाईक करा

सातासमुद्रापार देशांमध्ये भ्रमंती करून, तेथील चालीरीती, इतिहास, माणसांचे नमुने, अनुभव, खाद्यसंस्कृती यांचे सहजसुंदर आणि मिस्कील शैलीत वर्णन करणाऱ्या मीना प्रभू यांच्या पुस्तकांनी वाचनाची किंवा प्रवासाचीही आवड नसलेल्यांना आकर्षित केले आहे. विवाहानंतर लंडनमध्ये स्थायिक झाल्यानंतर तेथील भटकंतीतून साकार झालेल्या “माझं लंडन’पासून सुरू झालेला त्यांचा लेखनप्रवास मेक्‍सिकोपर्व’, दक्षिणरंग’, चिनी माती’, इजिप्तायन’, ग्रीकांजली’, तुर्कनामा’, गाथा इराणी रोमराज्य’ (भाग 1 आणि 2), वाट तिबेटची’ या मार्गाने “न्यूयॉर्क, न्यू यॉर्क : एका नगरात जग’ (भाग 1 आणि 2) या पुस्तकावर येऊन ठेपला आहे. ही सर्वच पुस्तके केवळ प्रवासवर्णने नाहीत, की त्यात वरदेखले वर्णन आणि आत्मचिंतनही नाही.

एखाद्या पर्यटकाला त्या त्या ठिकाणी गेल्यानंतर उपयुक्‍त ठरतील, अशा “गाइड’ची भूमिका ही पुस्तके बजावतातच; पण त्यापुढे जाऊन त्या त्या ठिकाणचे राजकारण, अर्थकारण, धर्म, संस्कृती, इतिहास, माणसांचे स्वभाव अशा अनेक पैलूंनाही मीनाताईंची पुस्तके अतिशय जवळून स्पर्श करतात.

मग इराणमधील पुरुषसंकुचित समाजातील महिलांच्या व्यथा असोत, की रोमबाहेरच्या कॅटॅकूम्बमधील भुयारी शवागार असो, प्रत्येक ठिकाणच्या अद्‌भुत, कुतूहल जागवणाऱ्या गोष्टी मीनाताईंच्या पुस्तकांत पानोपानी ठाण मांडून आहेत. वयोपरत्वे माणसाची गतीही मंदावते; पण मीनाताईंचे शरीर आणि मन आजही त्याच वेगाने जगाच्या मुशाफिरीसाठी सज्ज असते. त्यामुळे न्यू यॉर्क, न्यू यॉर्क, एका नगरात जग’ या पुस्तकानंतर त्यांनी काहीसा विराम घेतला आहे.

एके ठिकाणी त्या लिहितात, “भारतात शरद ऋतू येतो आणि आपण त्याची फारशी दखल घेण्याआधीच तो निघून जातो. झाडांची पानं थोडीफार खाली पडतात, पण बरीचशी जुनी पानं जाग्यावर असतानाच त्यांना नवी पालवी फुटते. इंग्लंडमध्ये असं नसतं. सप्टेंबर-ऑक्‍टोबरमधे ‘एव्हरग्रीन’ झाडांचा अपवाद वगळता बाकीच्या प्रत्येक झाडावरचं प्रत्येक पान खाली उतरतं. तांबूससोनेरी पानांच्या जाड पायघड्या उद्यानांमधून हिरवळीच्या कडेनं अंथरल्या जातात. ही पानं कुजकी बिळबीळीत नसतात. हिवाळ्याच्या प्रारंभी झाड त्यांच्यातला जीवनरस शोषून घेतं. पुस्तकात घालून ठेवलेल्या पानांसारखं त्यांना जाळीदार आणि रेखीव करतं. पडलेली ही चुरचुरीत पानं मग वारा गोळा करतो. घोटाभर पाऊल बुडवणाऱ्या या गालिच्यावरून त्यांचा मंद सुगंध घेत अनवाणी चालावं.’


‘प्रभात’चे फेसबुक पेज लाईक करा


ताज्या बातम्यांसाठी प्रभातचे मोबाईल अॅप डाऊनलोड करा

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)