परवडण्याजोगे अौषधोपचार (भाग 3)

-प्रा.बेजाॅनकुमार मिश्रा

भारतातील आरोग्यसेवा विभाग सध्या निर्णायक परिस्थितीतून जात आहे. देशातील दरडोई आरोग्यसेवा खर्च केवळ 75 डॉलर्स आहे. चीनमध्ये हा खर्च 420 डॉलर्स आहे, तर जागतिक सरासरी 948 डॉलर्स आहे. भारतात या किरकोळ खर्चातील 62 टक्‍के खर्च रुग्णाला त्याच्या खिशातून करावा लागतो. (चीनमध्ये हे प्रमाण 32 टक्‍के आहे).

-Ads-

भूतकाळातील चुकांमधून शिकणे

राष्ट्रीय औषध दरनिश्‍चिती प्राधिकरणाने (एनपीपीए) स्टेण्ट्‌सचे दर 80 टक्‍क्‍यांपर्यंत खाली आणले तेव्हा या निर्णयामुळे अँजिओप्लास्टी प्रक्रिया सर्वांना परवडण्याजोगी होईल असे अपेक्षित होते. ही उपचार प्रक्रिया परवडण्याजोगी झाल्याने अंजिओप्लास्टींच्या संख्येत लक्षणीय वाढ होईल अशी सरकारची अपेक्षा होती.

मात्र, आयक्‍यूव्हीआयएने दरमर्यादेवर नुकत्याच केलेल्या एका अभ्यासानुसार, रुग्णांना झालेले लाभ आणि प्रक्रियेच्या संख्येत झालेली वाढ याबाबत लघुकाळात काहीच बदल दिसून आलेला नाही, तर दीर्घकालीन प्रभावही अद्याप दिसलेला नाही. या अहवालात पुढे म्हटले आहे की, अँजिओप्लास्टी प्रक्रिया करून घेण्याच्या प्रमाणात वाढ झालेली नाही, असे 80 टक्के रुग्णालयांनी सांगितले.

उर्वरित 20 टक्के रुग्णालयांमध्ये झालेली वाढही अत्यंत मर्यादित स्वरूपाची (केवळ 2-5 टक्के) होती. वाईट गोष्टी नष्ट करण्याच्या नादात त्यासोबत काही चांगल्या गोष्टींचाही नाश होत असेल तर आपण ते टाळले पाहिजे. भारतात आरोग्यसेवेवरील खर्चात वाढ करून आपण रुग्णांना अधिकाधिक आरोग्यसेवा उपलब्ध करून दिल्या पाहिजेत.

नवकल्पनांचे भवितव्य

सरकारने उत्पादनांची कमतरता किंवा असुरक्षित उत्पादनांचा शिरकाव यांना बढावा न देता परवडण्याजोग्या व दर्जेदार आरोग्यसेवेसाठी नवकल्पनांना पूरक, खात्रीशीर आणि शाश्‍वत असे वातावरण निर्माण करण्यासाठी प्रयत्न केले पाहिजेत.
सरकारने रुग्णांच्या संघटनांसमवेत सर्व संबंधित घटकांच्या सहयोगाने काम करून स्पर्धेला उत्तेजन दिले पाहिजे. दर्जा, सुरक्षितता व परवडण्याजोगे दर यांच्या हमीसाठी रुग्णामध्ये विज्ञान व पुराव्यांवर आधारित माहितीपूर्ण निवड करण्याची क्षमता निर्माण केली पाहिजे आणि टीएमआर या सगळ्याला नक्कीच प्रोत्साहन देईल.

परवडण्याजोगे अौषधोपचार (भाग 1)  परवडण्याजोगे अौषधोपचार (भाग 2)

What is your reaction?
1 :thumbsup:
0 :heart:
0 :joy:
0 :heart_eyes:
0 :blush:
0 :cry:
0 :rage:

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)