निवडणूक अधिकारी, कर्मचाऱ्यांसाठी वैद्यकीय सुविधा

पुणे – लोकसभेच्या 2019 च्या सार्वत्रिक निवडणुकांसाठी मंगळवारी मतदान होणार असून, महापालिकेच्या आरोग्य विभागातर्फे आठ विधानसभा मतदार संघात अधिकारी आणि कर्मचारी वैद्यकीय मदत आणि कल्याण कक्ष स्थापन करण्यात आले आहे. तसेच पुस्तिकाही प्रदर्शित करण्यात आली आहे.

हा कक्ष कशा स्वरूपाचा असावा, कक्षांतर्गत येणारी आरोग्य विषयक जबाबदारी या पुस्तिकेत नमूद करण्यात आली आहे. ही पुस्तिका प्रत्येक मतदान केंद्रांवर देण्यात आली आहे. 552 मतदान केंद्रांसाठी या सोयी करण्यात आल्या आहेत.
महापालिकेच्या अधिकाऱ्यांची संपर्क आणि नियंत्रण अधिकारी म्हणून नेमणूक करण्यात आली आहे. तसेच त्यांच्या अंतर्गत पथकही नेमण्यात आले आहे. ही नेमणूक सकाळी सात ते संध्याकाळी सात वाजेपर्यंत असणार आहे. हे कर्मचारीक्‍ अल्याण कक्ष महापालिकेच्या दवाखन्यांमध्ये आणि रुग्णालयांमध्ये स्थापन करण्यात आले आहे. आपले दवाखन्यातील आणि रुग्णालयातील रोजचे कामकाज सांभाळून हे वैद्यकीय अधिकारी हे काम करणार आहेत. यामध्ये रुग्णवाहिका, औषधे, नर्सेस, मदतनीस, वैद्यकीय अधिकारी, तज्ज्ञ डॉक्‍टर्स यांचा समावेश करण्यात आला आहे.

ऐन उन्हाळ्यात ही निवडणूक होणर असल्याने आणि वाढते तापमान लक्षात घेऊन उष्माघाताचा त्रास मतदान केंद्रावरील अधिकारी आणि कर्मचाऱ्यांनाही होऊ शकतो ही बाब विचारात घेऊन उष्माघातासंबंधी उपाययोजनांची माहिती पुस्तिकेत देण्यात आली आहे.

याशिवाय मतदारसंघ निहाय अग्निशमन विभाग, रुग्णालयांची माहिती, रुग्णवाहिका आदी माहितीही सविस्तर स्वरूपात संपर्क क्रमांकांसह देण्यात आली आहे. ही माहिती मानक कार्यकारी प्रणाली म्हणून वापरण्यात यावी अशी विनंती महापालिका आयुक्त सौरभ राव यांनी केली आहे.

Ads

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)