मेडिकल कॉलेजमध्ये मराठा आरक्षणाअंतर्गत प्रवेश नको 

एमबीबीएसच्या विद्यार्थ्यांची हायकोर्टात याचिका ; आज सुनावणी

मुंबई  – या वर्षी वैद्याकिय अभ्यासक्रम प्रवेश प्रकियेत 16 टक्के मराठा आरक्षण देण्याच्या राज्य सरकारच्या निर्णयाला आव्हान देणारी याचिका उच्च न्यायालयात दाखल करण्यात आली आहे. मराठा आरक्षणाअंतर्गत वैद्यकीय महाविद्यालयांमध्ये यावर्षी प्रवेश प्रक्रिया राबविण्यात येऊ नये अशी मागणी करणारी याचिका एमबीबीएस अभ्यासक्रमासाठी प्रवेश घेणाऱ्या विद्यार्थ्यांनी हायकोर्टात दाखल केली आहे. या याचिकेवरची सुनावणी उद्या गुरूवार दि. 11 जुलै रोजी निश्‍चित केली आहे. मराठा समाजाला शैक्षणिक आणि सामाजिक मागास प्रवर्गाअंतर्गत राज्य सरकारने आरक्षण जाहीर केले असून मुंबई उच्च न्यायालयाने जून महिन्यात हे आरक्षण वैध ठरवले आहे. त्यामुळे मराठा बांधवाना मोठा दिलासा मिळाला आहे.

त्यानुसार वैद्यकीय, दंतवैद्यकीय तसेच पदव्युत्तर अभ्यासक्रमाची प्रवेश प्रक्रिया राबविताना एससी बीसी कायद्याअंतर्गत जागा आरक्षित ठेवण्याबाबतचा अध्यादेश सरकारने काढला आहे. या अध्यादेशाला विरोध करत वैद्यकीय प्रवेशासाठी इच्छुक एमबीबीएसच्या विद्यार्थ्यांनी हायकोर्टात याचिका दाखल केली आहे. या याचिकेवर न्यायमूर्ती सत्यरंजन धर्माधिकारी आणि न्यायमूर्ती गौतम पटेल यांच्या खंडपीठासमोर आज प्राथमिक सुनावणी झाली. यावेळी याचिकाकर्त्यांच्यावतीने ऍड. वशी यांनी जोरदार राज्य सरकारच्या या निर्णयाला जोरदार विरोध केला.

राज्य सरकारने 30 नोव्हेंबर 2018 मध्ये हा कायदा संमत केला. तत्पूर्वी या अभ्यासक्रमासाठी प्रवेश प्रक्रिया सुरू झाली होती. त्यामुळे यंदा मराठा आरक्षणाअंतर्गत विद्यार्थ्यांना प्रवेश दिल्यास इतर विद्यार्थ्यांचे निश्‍चितच नुकसान होईल. याकडे न्यायालयाचे लक्ष वेधले. आज सुनावणी अपूर्ण राहिल्याने न्यायालयाने उद्या तातडीने सुनावणी घेण्याची निश्‍चित केले आहे.

Ads

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)