दूरदर्शनमध्येही “मी-टू’

10 महिलांनी केली लैंगिक शोषण झाल्याची तक्रार

मुंबई: दूरदर्शनमधील 10 महिलांनी आपले लैंगिक शोषण झाल्याची तक्रार केली असल्याने एकच खळबळ उडाली आहे. भंडारी ऍण्ड असोसिएट्‌स या लॉ फर्मने या महिलांशी बातचीत केली असून यावेळी त्यांनी हा खुलासा केल्याचे सांगितले आहे. इंडियन वुमन प्रेस कॉर्प्समध्ये आयोजित पत्रकार परिषदेत बोलताना तीन महिलांनी आपले अनुभव सर्वांसोबत शेअर केले.

याप्रकरणी एका वृत्तवाहिनीने दिलेल्या वृत्तानुसार, दूरदर्शनमध्ये काम करणाऱ्या एका महिला कर्मचाऱ्याने 2015 मध्ये आपल्या दोन वरिष्ठांविरोधात लैंगिक छळाचा आरोप केला होता. या तक्रारीनंतर पिडितेला कामावरुन काढून टाकण्यात आले. पीडित महिलेने केलेल्या आरोपानुसार, दूरदर्शनच्या अंतर्गत तक्रार समितीने दोषी ठरवूनही कोणतीही कारवाई करण्यात आली नाही. यानंतर पीडित महिलेला केंद्रीय प्रशासनिक न्यायाधिकरणाकडे धाव घ्यावी लागली.

दुसऱ्या एका प्रकरणात 36 वर्षीय महिलेने सांगितल्यानुसार, लैंगिक शोषणाची तक्रार केल्यानंतर मार्च महिन्यापासून तिचा पगार थांबवण्यात आला. तिसऱ्या प्रकरणात 38 वर्षीय महिलेने दूरदर्शनच्या कर्मचाऱ्याविरोधात तक्रार केली होती. यानंतर त्याचे निलंबन करण्यात आले. ती व्यक्ती अजून एका लैंगिक शोषणाच्या प्रकरणात सहभागी होती.

जर माझ्या कार्यालयात माहिती पुरवण्यात आली तर ती माहिती तपासून तात्काळ योग्य ती कारवाई करण्यात येईल. आम्ही अशा प्रकारची सर्व प्रकरणे गांभीर्याने घेतो’, अशी माहिती प्रसार भारतीचे सीईओ शशी वेम्पती यांनी दिली आहे.


‘प्रभात’चे फेसबुक पेज लाईक करा

What is your reaction?
0 :thumbsup:
0 :heart:
0 :joy:
0 :heart_eyes:
0 :blush:
0 :cry:
0 :rage:

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)