#WWCHs2018 : मेरी कोमची सुवर्णभरारी

नवी दिल्ली : जागतिक महिला अंजिक्यपद बाॅक्सिंग स्पर्धेमध्ये भारताची आघाडीची बाॅक्सिंगपटू मेरी कोम हिने सुवर्णपदक पटकावले आहे. जागतिक महिला अंजिक्यपद बाॅक्सिंग स्पर्धेतील अंतिम लढतीत 48 किलो वजनी गटात मेरी कोमने युक्रेनच्या हेना अोखोता हिचा 5-0 ने पराभव करत विजेतेपद पटकाविले.

-Ads-

मेरी कोमने आजच्या विजेतेपदानंतर कारकिर्दीतील सहावे सुवर्णपदक आणि एकूण 7 वे पदक आपल्या नावे केले आहे. याचबरोबर मेरी कोमने केटी टेलर हीला विक्रमाच्या बाबतीत मागे टाकत क्यूबाच्या फेलिक्स सैवाॅन यांच्या विक्रमाशी बरोबरी केली आहे. टेलर हिने पाचवेळेस विश्वविजेतेपद जिंकत पाच सुवर्णपदक पटाकावले आहेत. तर दुसरीकडे सैवाॅन याने या सहा विजेतेपद जिंकत सहा सुवर्णपदक पटकाविले आहेत.

 


‘प्रभात’चे फेसबुक पेज लाईक करा

What is your reaction?
0 :thumbsup: Thumbs up
0 :heart: Love
0 :joy: Joy
0 :heart_eyes: Awesome
0 :blush: Great
0 :cry: Sad
0 :rage: Angry

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)