महापौरांची लायकी “हेल्पर’ची : बोराटे

महापौरांनी शहरातील जमिनी लाटल्या; मुलाची जन्मतारीख लपविली

नगर -तुमच्यापेक्षा जास्तवेळा नगरसेवक म्हणून निवडून आलो तेही सर्वाधिक मतांनी. माझ्या विजयाचा आलेख वाढता आहे. मी नगरसेवक असतांना महापौर बाबासाहेब वाकळे कंपनीत हेल्पर होते. त्यामुळे तुमची लायकी जनतेला महिती आहे. वाकळे यांनी अनेकांच्या जमिनी लाटल्या आहेत.

स्वत:च्याच वॉर्डाचा विकास
मुख्यमंत्र्यांकडून दहा कोटींचा विशेष निधी महापौरांनी मंजूर केला. मात्र त्यांनी तो स्वत:च्याच प्रभागासाठी वापरला. शहराचे महापौर आहेत याचा विसर हे वाकळेंना पडला आहे. दहा कोटींचा निधी तुम्ही आणला की कोणी आणला? याचाही त्यांनी खुलासा केला पाहिजे, असे बोराटे म्हणाले. 

म्हणून त्यांच्याकडे मोठ्या प्रमाणावर संपत्ती जमा झाली. स्वत:च्या नातेवाइकांच्याही जमिनी त्यांनी लाटल्या. ज्यांनी त्यांना महापौर होण्यासाठी पैसे दिले तेच त्यांचे खरे बोल बोलवते धनी आहेत, असा आरोप शिवसेनेचे नगरसेवक बाळासाहेब बोराटे यांनी आज झालेल्या पत्रकार परिषदेत केला.

बोराटे यांनी महापौर वाकळे यांनी नगररचना विभागातील कल्याण बल्लाळ यांची पैसे घेऊन बदली केल्याचा आरोप केला होता. त्याला उत्तर देताना वाकळे यांनी बोराटे यांची लायकी काय आहे? हे सर्व नगरला माहित आहे, असे प्रत्युत्तर दिले होते. त्याला उत्तर देण्यासाठी शुक्रवारी बोराटे यांनी पुन्हा पत्रकार परिषदेच्या माध्यमातून महापौरांवर अत्यंत वैयक्तिक पातळीवर टीका केली.

ते म्हणाले, शंभर कर्मचाऱ्यांचे बदलीचे अर्ज प्रलंबित असताना बल्लाळ यांची बदलीचा अर्ज मात्र तातडीने मंजूर कसा होतो. माझी लायकी काढणारे वाकळे यांची प्रत्यक्षात काय लायकी आहे ? हे याचे त्यांनी आत्मपरीक्षण करावे. लोढा थमार्कोलमध्ये हेल्पर म्हणून काम करणाऱ्या वाकळे यांच्याकडे एवढी संपत्ती आली कोठून? असा सवाल त्यांनी केला.

बदली करणे हा विषय महापौरांचा नव्हे तर आयुक्तांचा आहे. स्वत:च्या अपत्याच्या तारखा लपवणारे महापौरांनी आधी स्वत:ची लायकी तपासावी. महापौरांनी नातेवाईकांचे प्लॉटही हडप करण्याचे सोडले नाहीत. आपण वैफल्यग्रस्त असल्याचाही वाकळे यांचा आरोप आहे. मात्र आपण कुठे वैफल्यग्रस्त दिसतो का ? असा सवाल त्यांनी पत्रकारांना केला. शिवसेनेच्या काळात पथदिवे घोटाळा काढला. एका अभियंत्याला सोडवण्यासाठी ठेकेदारांनी कशी मदत केली, त्याचे पुरावे आमच्याकडे आहेत.

कल्याण रोडवरील झालेल्या कार्यक्रमात शिवसेनेचे उपनेते अनिल राठोड यांनी वाकळे यांचे नव्हे तर माजी महापौर सुरेखा कदम यांच्या कामाचे कौतुक केले, असेही बोराटे यांनी स्पष्टीकरण दिले. या पत्रकार परिषदेला शहरप्रमुख दिलीप सातपुते, नगरसेवक अनिल शिंदे, संभाजी कदम, गटनेते संजय शेंडगे, अनिल बोरूडे, दत्ता सप्रे, अर्जुन बोरूडे आदी उपस्थित होते.

महापौरपद 14 कोटींत घेतले

महापौरपदासाठी 13 ते 14 कोटी रुपये वाकळेंनी खर्च केले. ही वसुली करण्यासाठी वाकळेंनी बल्लाळ यांची बदली करून बेयकादेशीर जमिनी नियमात बसून वसुली सुरू केली आहे. त्यांनी महापौर झाल्यापासून शहरासाठी कोणते ठोस काम केले? बल्लाळ यांनी स्वेच्छानिवृत्तीसाठी अर्ज दिला होता. मात्र तो प्रशासनाने स्वीकारला नाही. बल्लाळ यांची नगररचना विभागात महापौरांनी बेकायदेशीर पद्धतीने बदली केली. कुष्ठधाम परिसरातील तीन ते चार एकर जागा कोणी कोणी घेतली व कोण कोण त्या व्यवहारात आहेत, याची जनतेस माहिती मिळाली पाहिजे.

Ads

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here