राफेल प्रकरणावरून मायावतींचाही मोदींवर निशाणा

लखनौ : राफेल विमान घोटाळा प्रकरणात आता बहुजन समाज पक्षाच्या नेत्या मायावती यांनीही पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यावर निशाणा साधला आहे. चौकीदाराच्या हितासाठी देशाच्या हिताशी, प्रामाणिकपणाशी आणि देशाच्या सुरक्षेशी तडजोड करण्यात आली आहे असे त्यांनी म्हटले आहे.

राफेल प्रकरणातील आणखी एक तथ्य आज एका राष्ट्रीय दैनिकात उजेडात आले आहे. त्यात मोदी सरकारने फ्रांसच्या कंपनीला राफेल व्यवहारात अनेक अटी व शर्थींमध्ये सवलत दिली आहे. राफेल विषयक करारातून भ्रष्टाचार विरोधी कलमच वगळण्यात आले आहे. विशिष्ट खात्यातच राफेलचे पेमेंट करण्याची अटही यातून काढण्यात आली आहे असेही या वृत्तात म्हटले आहे.

या अनुषंगाने मायावती यांनी आपल्या ट्‌विटर अकौंटवर म्हटले आहे की भ्रष्टाचार आणि भ्रष्ट संरक्षण विषयक करार उघडकीला येऊनही भाजप आणि संघासाठी केवळ चौकीदार महत्वाचा आहे. हा प्रामणिकपणाच नाही काय असा टोमणा त्यांनी मारला आहे. या चौकीदारा विषयी आणि त्याच्या तथाकथित प्रामाणिकपणाविषयी आता काय करायचे याचा निर्णय देशातील जनताच घेईल असेही त्यांनी म्हटले आहे. सरकारी पैशातून हा चौकीदार देशात सर्वत्र हिंडतो आहे पक्षाचा प्रचार करतो आहे. आणि तो स्वताला प्रामाणिक आणि स्वच्छ मानतो आहे असेही मायावतींनी मोदींवर निशाणा साधताना म्हटले आहे.

Ads

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)