मध्यप्रदेश, राजस्थान सरकारांना दिलेल्या पाठिंब्याचा फेरविचार करावा लागेल : मायावतींचा इशारा

file photo

भारत बंदवेळी दाखल गुन्हे मागे घेण्याची मागणी

लखनौ: बसपच्या प्रमुख मायावती यांनी 2 एप्रिलच्या भारत बंदवेळी निष्पाप व्यक्तींवर दाखल झालेले गुन्हे मागे घेण्याची मागणी केली आहे. तसे न झाल्यास मध्यप्रदेश आणि राजस्थान सरकारांना बसपने बाहेरून दिलेल्या पाठिंब्याचा फेरविचार करावा लागेल, असा इशारा त्यांनी दिला आहे. त्यामुळे कॉंग्रेसचे टेन्शन वाढणार आहे.

-Ads-
दैनिक प्रभातचे फेसबुक पेज लाईक करा

मध्यप्रदेश आणि राजस्थानमधील नव्या सरकारांनी तातडीने कृती करून गुन्हे मागे घ्यावेत, असे मायावती यांनी निवेदनात म्हटले आहे. उत्तरप्रदेश, मध्यप्रदेश आणि राजस्थानात राजकीय आणि जातींचा विचार करून निष्पाप व्यक्तींवर गुन्हे दाखल करण्यात आले. भाजपच्या राजवटीत ते घडले. आता मध्यप्रदेश आणि राजस्थानात कॉंग्रेसची सत्ता आहे. त्यामुळे त्या दोन राज्यांतील नव्या सरकारांनी त्यासंदर्भात पाऊले उचलावीत, असे मायावतींनी नमूद केले आहे.

बसपचे मध्यप्रदेशात 2 तर राजस्थानात 6 आमदार आहेत. दोन्ही राज्यांत नुकत्याच झालेल्या विधानसभा निवडणुकांत कॉंग्रेस सर्वांत मोठा पक्ष ठरला. मात्र, बहुमतापासून काहीसा दूर राहिला. त्यामुळे त्या राज्यांत बसपने बाहेरून दिलेला पाठिंबा महत्वाचा आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)