मायावतींचा मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांच्यावर हल्लाबोल !

लखनऊ: उत्तर प्रदेशच्या माजी मुख्यमंत्री मायावती यांनी महिलांच्या सुरक्षेवरून मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांच्यावर जोरदार हल्लाबोल केला आहे. मायावती म्हणाल्या उत्तर प्रदेशमध्ये सुद्धा बिहारसारखे घाणेरडी कृत्ये घडली आहेत. मात्र सरकारला याबाबत गांभीर्य नाही. 

मायावतींनी अश्या घटनांमध्ये दोषी असलेल्यांना कठोर शिक्षेची मागणी केली आहे. त्या म्हणाल्या, भाजपचे सरकार असलेल्या राज्यात जंगलराज आहे. तसेच महिलांचा सन्मान आणि सुरक्षा भाजपच्या कार्यपद्धतीचा भाग नाही. ही सर्व देशासाठी लाजिरवाणी आणि चिंतेची गोष्ट आहे. 

-Ads-

बिहारसारख्या घटना सरकारी वरदहस्त असल्याशिवाय शक्य होत नाहीत. असा आरोप मायावतींनी सरकारवर केला. 


‘प्रभात’चे फेसबुक पेज लाईक करा

What is your reaction?
0 :thumbsup: Thumbs up
0 :heart: Love
0 :joy: Joy
0 :heart_eyes: Awesome
0 :blush: Great
0 :cry: Sad
0 :rage: Angry

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)