मायावती झाल्या ‘मुलायम’, लोकसभा निवडणूक न लढवण्याचा निर्धार

लखनौ – बहुजन समाजवादी पक्षाच्या अध्यक्षा मायावती यांनी बसपच्या वरिष्ठ नेत्यांच्या बैठकीत लोकसभा निवडणूक न लढण्याचा निर्धार व्यक्त केला आहे. समाजवादी पक्ष आणि बसपच्या उमेदवारांचा प्रचार करण्यासाठी त्या केवळ देशभर दौरे करणार आहेत.

इतकेच नव्हे तर कट्टर विरोधक मुलायम सिहं यादव यांच्यासाठी मैनपूरीत रॅली घेण्याची तयारीही मायावतींनी केली आहे. अखिलेश यादव आणि अजित सिहं यांच्या जोडीने मायावती प्रचार संबोधित करणार आहेत.

एकट्या उत्तर प्रदेशात मायावती एकूण 39 सभांत भाग घेणार आहेत. विशेष म्हणजे प्रचाराची सुरूवात ही नागपूर येथून होणार आहे.

Ads

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)