मायावती लोकसभेच्या रिंगणातून बाहेर

लोकसभा निवडणुका अवघ्या काही दिवसांवर येऊन ठेपल्या असून देशभरामध्ये विविध राजकीय पक्षांकडून निवडणुकांसाठी जोरदार तयारी सुरू झाली आहे. उत्तर प्रदेशमध्ये सपा बसपा या दोन प्रादेशिक पक्षांनी आघाडी केली असून उत्तर प्रदेशात मायावती अखिलेशच्या जोडीला चांगला जनाधार लाभेल अशी चर्चा सध्या राजकीय वर्तुळात सुरू आहे.

दरम्यान आज बहुजन समाज पक्षाच्या सर्वेसर्वा मायावती यांनी आपण 2019च्या लोकसभा निवडणुकीमध्ये उमेदवारी दाखल करणार नाही असे स्पष्ट केले आहे. महाराष्ट्रमध्ये देखील राष्ट्रवादी काँग्रेसचे ज्येष्ठ नेते शरद पवार यांनी लोकसभा निवडणुकांमधून माघार घेण्याचा निर्णय घेतला होता मायावती यांनी आपले नाव मागे घेतल्यामुळे आता मुख्य भाजपविरोधी पक्षांमधील आणखीन एक प्रमुख नेत्याने लोकसभा निवडणुकांच्या रिंगणातून माघार घेतल्याचे चित्र निर्माण झाले आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)