मोदींच्या खोट्या प्रचारापासून जनतेने सावध रहावे -मायावती

लखनऊ – समाजवादी पक्ष आणि राष्ट्रीय लोकदल पक्ष यांच्यासोबत युती केल्यानंतर समाजवादी पक्षाच्या प्रमुख मायावती यांनी पंतप्रधान मोदी यांच्यावर चांगलेच टिकास्त्र सुरू केले आहे. ट्विटर अकाउंटवर सक्रिय झाल्यानंतर असा एकही दिवस नाही, त्यादिवशी मायावती यांनी पंतप्रधान मोदींवर टीका करणे टाळले आहे.

मायावती यांनी आज ट्विट करत जनतेला मोदींच्या खोट्या प्रचारापासून सावध राहण्याचा सल्ला दिला आहे. मायावती यांनी म्हटलं आहे की, “भाजप आणि पंतप्रधान नरेंद्र मोदी हे जनतेपासून आपल्या सरकारचे अपयश लपविण्यासाठी तसेच गरीबी आणि बेरोजगारी इत्यादी मुद्यांवरून होणारी टीका टाळण्यासाठी मेलेले मुर्दे उकारण्याचा प्रयत्न करीत आहेत. जनतेने असल्या प्रचारापासून सावध रहावे”.

पुढे त्यांनी म्हटले आहे की, ठमोदी हे त्यांच्या पाच वर्षाच्या कार्यकाळात जास्तकरून भूमिपूजन, इत्यादी कार्यक्रमात व्यस्त राहिले. प्रचार-प्रसारासाठी त्याने 3044 कोटी रूपये खर्च केले. या सरकारी पैशांतून उत्तर प्रदेशातील ग्रामीण-दुर्लक्षित अशा प्रत्येक गावात शिक्षण-रूग्णालयाची व्यवस्था झाली असती पण भाजपासाठी प्रचार करणे हे महत्वाचे होते. शिक्षण-आरोग्य नव्हे”.

https://twitter.com/Mayawati/status/1106769363074469889

Ads

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)