महाराष्ट्राच्या मयंक, ओंकार, शिवतेज यांना सुवर्ण

पुणे – महाराष्ट्राच्या मयंक चाफेकर, ओंकार रत्नोजी, शिवतेज पवार यांनी दुस-या राष्ट्रीय लेझर रन स्पर्धेत आपापल्या गटात सुवर्णपदक मिळवले. मॉडर्न पेंटॅथलॉन फेडरेशन ऑफ इंडियाच्या सहकायार्ने मॉडर्न पेंटॅथलॉन फेडरेशन ऑफ महाराष्ट्राच्या वतीने आयोजित ही स्पर्धा शनिवारी म्हाळुंगे-बालेवाडी येथील शिवछत्रपती क्रीडानगरीत झाली. या स्पर्धेतून बुडापेस्टमधील हंगेरी येथे होणाऱ्या लेझर रन जागतिक स्पर्धेसाठी भारतीय संघाची निवड होणार आहे. त्यामुळे या स्पर्धेला विशेष महत्त्व प्राप्त झाले आहे.

स्पर्धेचे उद्‌घाटन ऑलिंपिक असोसिएशन ऑफ इंडियाचे सहसचिव आणि एशियन मॉडर्न पेंटॅथलॉन कॉन्फेडरेशनचे सचिव नामदेव शिरगावकर यांच्या हस्ते झाले. या वेळी जिल्हा क्रीडाधिकारी विजय संतान, मॉडर्न पेंटॅथलॉन फेडरेशन ऑफ इंडियाचे अध्यक्ष सुनील पूर्णपात्रे, प्रमुख प्रशिक्षक जितेंद्र खासनीस आदी मान्यवर उपस्थित होते.

स्पर्धेतील ज्युनियर मुलांच्या (19 ते 21 वर्षांखालील मुले) गटात महाराष्ट्राच्या मयंकने अव्वल क्रमांक पटकावला. त्याने 4 बाय 800 मीटर धावणे, 4 बाय 5 हिट्‌स आणि 10 मीटर नेमबाजी असे तीन प्रकारांत मिळून 11 मिनिटे 56.75 सेकंद वेळ नोंदवली. मध्य प्रदेशचा आकाश डागोर (13 मि. 08.29 से.) दुस-या, तर मध्य प्रदेशचा नीलेश साहू (13 मि. 10.07 से.) तिसऱ्या स्थानावर राहिला. यानंतर 19 वर्षांखालील मुलांच्या गटात ओंकार रत्नोजीने बाजी मारली. त्याने 13 मिनिटे 13.21 सेकंद वेळ नोंदवली. आंध्र प्रदेशचे के. मल्लीकार्जुन (13 मि. 42.74 से.) दुस-या, तर सी. पवनकुमार (13 मि. 54.49 से.) तिस-या स्थानावर राहिले.

यानंतर 17 वर्षांखालील मुलांच्या गटात 4 बाय400 मीटर धावणे, 4 बाय 5 हिट्‌स, 10 मीटर नेमबाजी असे प्रकार होते. यात शिवतेज पवारने 7 मिनिटे 30.37 सेकंद वेळ नोंदवून प्रथम क्रमांक पटकावला. महाराष्ट्राचा आर्यन पाटील (8 मि. 20.15 से.) दुस-या, तर आंध्रचा के. सुर्या प्रकाश (8 मि. 24.30 से.) तिसऱ्या स्थानावर राहिला.

सविस्तर निकाल – वरिष्ठ गट पुरुष (वय 22 ते 39 ) – जी. महेश (आंध्र प्रदेश) – 14 मिनिटे 18.51 सेकंद, के. तरुणकुमार (आंध्र प्रदेश) – 14 मिनिटे 29.00 सेकंद, सौरभ पाटील (महाराष्ट्र) – 14 मिनिटे 35.95 से.

Ads

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)