शेकडो मेक्‍सिकन घुसखोरांनी केला अमेरिकत घुसखोरीचा प्रयत्न 

अमेरिकेन बंद केली सीमा 

तिजोना (मेक्‍सिको): मेक्‍सिकोतील अनेक बेकायदेशीर घुसखोरांनी दक्षिण कॅलिफोर्निया सीमा भागातून आज कुंपण ओलांडून अमेरिकेत घुसखोरी करण्याचा प्रयत्न केला. त्यांना रोखण्यासाठी अमेरिकन अधिकाऱ्यांनी त्या भागातील सीमा बंद करून टाकली असून घुसखोरांच्या विरोधात कडक कारवाई केली जात आहे.

-Ads-

अमेरिकेच्या कस्टम आणि सीमा संरक्षण विभागाच्यावतीने सांगण्यात आले आहे की आम्ही उत्तर आणि दक्षिणेकडील सर्व मार्ग बंद केले असून तेथील रस्ता वाहतूकही पुर्ण रोखण्यात आली आहे. पायी चालणारांना सुद्धा तेथे प्रवेश बंदी करण्यात आली आहे. तीनच दिवसांपुर्वी अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी मेक्‍सिकोच्या बाजूने होणारी घुसखोरी रोखण्यासाठी संपुर्ण सीमा बंद करण्याचा इशारा दिला होता. ही घुसखोरी थांबली नाही तर आमच्या सहनशीलतेचा अंत होईल आणि घुसखोरांना गंभीर ईजा व्हायला सुरूवात होईल असेही त्यांनी म्हटले होते.

मध्य अमेरिकेतील हजारो नागरीक अमेरिकत घुसण्यासाठी मेक्‍सिको मधील तिजुआना येथे जमले आहेत. त्यांच्यातील शेकडो लोकांनी कुंपण ओलांडून आणि अमेरिकन सुरक्षा रक्षकांशी धक्काबुक्की करून अमेरिकत घुसण्याचा प्रयत्न केला त्यावेळी त्यांच्यावर पाण्याचे फवारे सोडण्यात आले तसेच त्यांच्यावर अश्रुधुराचा वापर व लाठी हल्लाही करण्यात आला. सीमा भागातून झालेल्या या धुमश्‍चक्रीवर नियंत्रण ठेवण्यासाठी अमेरिकन हवाईदलाची हेलिकॉप्टरही तेथे पाठवण्यात आली आहेत. अमेरिकन सुरक्षा जवानांनी घुसखोरांचे हे जथे बळाचा वापर करून परत पाठवले पण तरीही गटागटाने अमेरिकन हद्दीत घुसण्याचे या नागरीकांचे प्रयत्न जारीच आहेत.


‘प्रभात’चे फेसबुक पेज लाईक करा

What is your reaction?
0 :thumbsup: Thumbs up
0 :heart: Love
0 :joy: Joy
0 :heart_eyes: Awesome
0 :blush: Great
0 :cry: Sad
0 :rage: Angry

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)