आमदारांची विजयाची हॅट्ट्रिक अन्‌ मंत्रीपद निश्‍चित!

तळेगाव दाभाडे : जलसंधारण आणि राज शिष्टाचार मंत्री प्रा.राम शिंदे, सुरेशभाई शहा, आमदार बाळा भेगडे यांच्या हस्ते पुरस्कार स्वीकारताना पुष्पा वाडेकर व ज्येष्ठ नेते स्व. केशवराव वाडेकर यांचे कुटुंबीय.

मंत्री प्रा. राम शिंदे : संजय भेगडे यांचे कौतुक

तळेगाव दाभाडे  – मावळचे आमदार संजय उर्फ बाळा भेगडे यांनी मागील दहा वर्षांत तालुक्‍यात भरीव, रचनात्मक व विधायक कामे केली असून विकासाची गंगा आणली आहे. आगामी विधानसभा निवडणुकीत त्यांची विजयाची हॅट्ट्रिक निश्‍चित असून त्यांना मंत्रिपदापासून कोणीही रोखू शकत नाही, असे प्रतिपादन राज्याचे जलसंधारण आणि राज शिष्टाचार मंत्री प्रा. राम शिंदे यांनी केले.

-Ads-
दैनिक प्रभातचे फेसबुक पेज लाईक करा

आमदार संजय उर्फ बाळा भेगडे यांच्या वाढदिवसानिमित्त आमदार बाळा भेगडे मित्र परिवाराच्या वतीने येथील थोर समाजसेवक नथुभाऊ भेगडे पाटील शाळेच्या प्रांगणात संपन्न झालेल्या जीवनगौरव, मावळरत्न पुरस्काराचे वितरण प्रसंगी ते बोलत होते.प्रास्ताविक संदीप काकडे यांनी केले.

पुणे जिल्हा भाजपचे माजी अध्यक्ष (स्व.) केशवराव वाडेकर यांना मरणोत्तार जीवनगौरव पुरस्काराने सन्मानित करण्यात आले. एक लाख रुपये रोख, मानपत्र व सन्मानचिन्ह असे पुरस्काराचे स्वरूप होते. हा पुरस्कार त्यांच्या पत्नी पुष्पा वाडेकर आणि कुटुंबीयांनी स्वीकारला. पुरस्काराची एक लाख रुपयांची रक्‍कम वाडेकर कुटुंबीयांनी भाजपा कार्यालयाच्या देखभालीसाठी दिली.

आमदार भेगडे म्हणाले, मी मतदार आणि जनतेच्या मनातला मंत्री असल्याचा मला अभिमान आहे.प्रा.राम शिंदे आणि बाळा भेगडे यांच्या हस्ते सुरेशभाई शाह, बाळासाहेब जांभुळकर, शंकरराव शेलार, चंद्रकांत सातकर, पांडुरंग उंडे, बाजीराव शेटे, रघुनाथ लोहोर, सोपानराव म्हाळसकर, ह.भ.प.रवींद्र महाराज पंडित, गणपतराव काळोखे गुरुजी, अशोकराव साकोरे, नितीन आगरवाल, सुभाष महाराज पडवळ, उषा रोकडे, नितीन म्हाळसकर, व्याख्याते विवेक गुरव यांना मावळ रत्न पुरस्काराने सन्मानित करण्यात आले.

सत्कारर्थींच्या वतीने चंद्रकांत सातकर आणि शंकरराव शेलार यांनी मनोगत व्यक्‍त केले. “जल्लोष सूर तालांचा, उत्सव आनंदाचा’ कार्यक्रम झाला. सुप्रसिद्ध पार्श्‍वगायक सुरेश वाडकर, आदर्श शिंदे, संगीतकार जतिन पंडित, ज्योती गोराणे, सोहम गोराणे, अक्षया अय्यर यांनी कला सादर केली. यावेळी मान्यवरांच्या हस्ते पै. विश्‍वनाथराव भेगडे नागरी सहकारी पतसंस्थेच्या दिनदर्शिकेचे प्रकाशन करण्यात आले. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन सुप्रसिद्ध कलाकार जॉकी बंड्या आणि मेघना एरंडे यांनी केले. कार्यक्रमाचे संयोजन जिल्हा भाजपचे प्रभारी गणेश भेगडे, संदीप काकडे, राहुल गोळे आणि सहका-यांनी केले.


‘प्रभात’चे फेसबुक पेज लाईक करा


ताज्या बातम्यांसाठी प्रभातचे मोबाईल अॅप डाऊनलोड करा

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)