‘मावळ लीग टी-20’ स्पर्धेत “ड्रीम ट्रीम’ला विजेतेपद

क्रिकेट स्पर्धा : “मॅन ऑफ द सिरीज’ राहुल असबे, तर उत्कृष्ट गोलंदाजाचा शैलेश वहिलेला बहुमान

वडगाव मावळ – प्रशांत वहिले प्रतिष्ठान आणि क्रिकेट क्‍लबच्या वतीने आयोजित मावळ क्रिकेट लीग टी-20 जिल्हास्तरीय क्रिकेट स्पर्धेत ग्रामीण भागातील क्रिकेटप्रेमींना वाव मिळावा, या उद्देशाने पुणे जिल्ह्यात प्रथमच गुलाबी चेंडूवर ही स्पर्धा घेण्यात आली. ही स्पर्धा वेदांत ग्राउंड परंदवाडी येथे झाली. या स्पर्धेत नगरसेवक राजेंद्र कुडे, किरण म्हाळसकर, राहुल ढोरे, सायली म्हाळसकर, उद्योजक अनिल मालपोट, शामराव ढोरे, स्वप्नील अशिष परदेशी मंगेश देशमुख, रजनीश ढोरे, अशोक पडवळ, संदीप देवकर, नितीन बाफणा, मयूर अवचट विशेष सहकार्य केले. तसेच या स्पर्धेत मनिभद्र मोबाईल शॉपी- प्रीतम दुमावत, गुरुकृपा हॉटेल यांच्याकडून आकर्षक पारितोषिक ठेवण्यात आले.

-Ads-
दैनिक प्रभातचे फेसबुक पेज लाईक करा

स्पर्धेत जिल्ह्यातील एकूण 16 संघानी सहभाग घेतला. एकूण 32 सामने झाले. पंच म्हणून पवन पाली, घोरपागर, पेंडसे यांनी काम पाहिले. या स्पर्धेत ड्रीम ट्रीमने प्रथम क्रमांक, प्रशांत वहिले क्‍लबने द्वितीय क्रमांक, देहू क्‍लबने तृतीय क्रमांक, सेंन्ट्रल रेल्वे पुणे यांनी चतुर्थ क्रमांक पटकावला.

या स्पर्धेतमध्ये वैयक्तिक कामगिरी करणारे खेळाडू राहुल असबे (मॅन आँफ द सिरीज), शैलेश वहिले (सिरीज उत्कृष्ट गोलंदाज), अमेय जाधव (सिरीज उत्कृष्ट फलंदाज), अमोल ठोंबरे (उत्कृष्ट विकेट किपर), नेहाल (उत्कृष्ट फिल्डर) जेसीबी (उत्कृष्ट संघ) यांनी संपूर्ण स्पर्धेतील पारितोषिक पटकवले. पारितोषिक वितरण राजेश ढोरे, विवेक गुरव, संजय दंडेल, संतोष थिटे, मंगेश खैरे, सतीश पाटील, शैलेश ढोरे आदींच्या उपस्थितीत झाला.

तसेच कार्यक्रमाचे सूत्रसंचालन कार्याध्यक्ष संतोष खैरे, शैलेश वहिले, रोहित गिरमे, संदीप ढोरे, मयुर वाघमारे, प्रशांत जाचक, रोशन मोरे, पुरंदर शेट्टी, लखन आंबेकर, दत्ता पवार, प्रतीक भाटीया, मयूर अवचट, प्रफुल्ल चौधरी, मंगेश वाघमारे, सचिव अमोल ठोंबरे, कार्यक्रम प्रमुख किरण धाडवे, अध्यक्ष रोहित गिरमे यांनी आभार मानले.


‘प्रभात’चे फेसबुक पेज लाईक करा


ताज्या बातम्यांसाठी प्रभातचे मोबाईल अॅप डाऊनलोड करा

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)