न्यू इंग्लिश स्कूलमधील विज्ञान प्रदर्शनात मावळातील 83 शाळांचा सहभाग

वडगाव मावळ – येथील न्यू इंग्लिश स्कूल व ज्यु कॉलेजमध्ये रयत संकुलात बुधवारी (दि. 19) व गुरुवारी (दि. 20) विज्ञान प्रदर्शन संपन्न झाले. या प्रदर्शनात तालुक्‍यातील 83 शाळा सहभागी झाल्या. या प्रदर्शनानिमित्त आयोजित विविध स्पर्धांचे बक्षीस वितरण समारंभ सोहळा पार पडला. या वेळी रयत शिक्षण संस्थेचे पुणे विभागाचे अधिकारी किसनराव रत्नपारखी, मनोज ढोरे, गटविकास अधिकारी शरदचंद्र माळी, डॉ. विकेषजी मुथा, अशोक शिरसाट, बाळासाहेब राक्षे, संजय गायकवाड, सुनिता भिलारे, दिपाली मोरे, प्रवीण चव्हाण, विनय विध्वंस, गणेश भोकरे, विद्यालयाचे प्राचार्य शंकर डुबल, पर्यवेक्षक पोपटराव कांबळे वितरण सोहळा पार पडला.

विद्यालयाचे प्राचार्य शंकर डुबल यांनी प्रास्ताविक भाषणात व्यक्‍त केले. प्रदर्शनाचा सर्वांना उपयोग होईल. हरिश्‍चंद्र माळी यांनी म्हटले की, विज्ञान प्रदर्शनात अधिकाधिक शाळांचा सहभाग असावा. डॉ. मुथा यांनी विज्ञान प्रदर्शनानिमित्त घेण्यात आलेल्या सर्व स्पर्धांमधील विजेत्या विद्यार्थ्यांना एक वर्षासाठी एक लाखाचा विमा मोफत काढून देण्याचे जाहीर केले.
“कौन बनेगा विज्ञान पती’ या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले.

-Ads-
दैनिक प्रभातचे फेसबुक पेज लाईक करा

प्रकल्प/प्रयोग या स्पर्धेचे विजेते पुढीलप्रमाणे – प्राथमिक गट : साहिल संतोष जाधव (नानासाहेब बलकवडे माध्यमिक विद्यालय साते, माध्यमिक गट : साक्षी सोनकुसरे (इंद्रायणी कनिष्ठ महाविद्यालय तळेगाव), शिक्षक गट : प्राथमिक गट – शैक्षणिक साधने निर्मिती स्पर्धा – गुळदे राहुल दादाराव जिल्हा परिषद प्राथमिक शाळा मोहितेवाडी, शिक्षक गट : (माध्यमिक) शैक्षणिक साधने निर्मिती स्पर्धा – तांबे शिवराज न्यू इंग्लिश स्कूल वडगाव मावळ.

“लोकसंख्या शिक्षण’ या स्पर्धा प्रकारात प्राथमिक गटातील प्रथम क्रमांक बारावकर सुरेखा, माध्यमिक गटातील प्रथम क्रमांक प्रभा काळे, प्रकल्प आणि प्रयोग परिचर गटात प्रथम क्रमांक गणेश देशपांडे. निबंध स्पर्धा : लहान गटातील विजेते स्वप्निल चवरे (प्रगती विद्यामंदिर, इंदोरी), मोठा गट : सौरभ चव्हाण (न्यू इंग्लिश स्कूल, वडगाव मावळ), इंग्रजी भाषेतील निबंध स्पर्धा : समीक्षा यादव (ऑक्‍झीलियम कॉन्वेंट हायस्कूल, लोणावळा), उच्च माध्यमिक आर्या शिंदे आर्या (न्यू इंग्लिश स्कूल, वडगाव मावळ), वक्‍तृत्व स्पर्धा : प्राथमिक गट : गणेश पाटील, (रामभाऊ परुळेकर) माध्यमिक गट : विवेक येवले (प्रगती विद्यामंदिर, इंदोरी) उच्च माध्यमिक गट : दिप्ती जांभूळकर (इंद्रायणी महाविद्यालय, तळेगाव).

प्रश्‍नमंजुषा स्पर्धा : माध्यमिक गट – नागेश गजेंद्रगडकर व निरंजन थिटे (सरस्वती विद्या मंदिर, तळेगाव), उच्च माध्यमिक गट : ज्योती बोंबले व दिया दिनेश (डी. पी. मेहता, लोणावळा), प्रश्‍न मंजुषा स्पर्धा आयोजन सविता तांबे, मोहिनी निघोजकर, वर्षा देवकर, निलीमा पाटील यांनी केले. या सर्व स्पर्धाच्या आयोजनात शोभा सूर्यवंशी, वैशाली वायसे यांनी विज्ञान, विभाग अध्यापकांना सहाय्यक म्हणून काम पाहिले. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन आत्माराम मोरे व सोनाली मुंगूसकर यांनी केले. पर्यवेक्षक पोपटराव कांबळे यांनी आभार मानले.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)