मावळ : चिंचोलीमध्ये शनैश्‍वर मंदिरात भाविकांची गर्दी

संग्रहित छायाचित्र...

शनि महात्म्य पठण : शनि अमावस्येनिमित्त धार्मिक कार्यक्रम साजरे

देहुरोड -चिंचोली येथील श्री शनैश्‍वर मंदिरात शनी अमावस्या व नववर्षाची प्रारंभानिमित्त भाविकांनी शनिवारी (दि. 5) पहाटेपासून रात्री उशिरापर्यंत दर्शनासाठी मोठी गर्दी केली होती. मंदिरात पहाटे अभिषेक, नित्यपूजा कलश पूजन, महापूजा, लघुरुद्र, जलाभिषेक, महायज्ञ, शनि महात्म्य पठण, आरती, भजन, महाप्रसाद आणि विविध धार्मिक कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले होते.

-Ads-
दैनिक प्रभातचे फेसबुक पेज लाईक करा

श्री संत तुकाराम महाराजांच्या पालखीचा पहिला विसावा ठिकाण असल्याने येथील मंदिराला पंचक्रोशीत वेगळे महत्व आहे. चिंचोलीतील श्री शनैश्‍वर देवस्थान ट्रस्ट व जगद्‌गुरू श्री संत तुकाराम महाराज उत्सव समिती यांच्या वतीने आयोजित शनी अमावस्या निमित्त पहाटे कलशाचे पूजन करण्यात आले. त्यानंतर सकाळी साडेसात वाजता शनी महाराजांचा लघुरुद्र अभिषेक “सीओडी’चे ब्रिगेडीअर सुजित यादव यांच्या हस्ते संपन्न झाला. पवित्र जलाभिषेक करण्यात आला. मनाली आणि प्रसन्न जाधव यांच्या हस्ते पूजन झाले.

दुपारी किन्हई येथील महिला भजनी मंडळ व चिंचोलीतील साईगणेश भजनी मंडळाचा भजनाचा कार्यक्रम संपनन झाला. महायज्ञात अनेक भाविकांनी सहभाग घेतला होता. दुपारी सुरू झालेला महाप्रसाद वाटप रात्री उशिरापर्यंत सुरू होते. शनिभक्‍तांनी महाप्रसाद वाटप करण्यासाठी सहकार्य केले. अनेक भाविक-भक्‍तांनी मंदिराच्या आवारात दिवसभर शनि महात्म्य पठण केले. साहनी आणि पादुका मंदिरावर व परिसरात विद्युत रोषणाई व मंदिरात फुलांची आकर्षक सजावट करण्यात आली होती. सायंकाळी नववर्षा निमित्त दीपोत्सव संपन्न करण्यात आले.

सायंकाळी तळेगाव नगरपरीषदेचे माजी उपाध्यक्ष सुनील शेळके आणि शिरगाव साई संस्थानचे जयशे मुळे यांच्या हस्ते ट्रस्टचे अध्यक्ष दत्तात्रय जाधव, सचिव रमेश जाधव तसेच शनिभक्‍तांच्या उपस्थित शनि महाराजांचे पूजन झाल्यानंतर आरती करण्यात आली. सायंकाळी आरतीला पंचक्रोशीतील भाविकांनी मोठी गर्दी केली होती. पहाटेपासून रांगा लावून भाविकांनी दर्शनाचा व महाप्रसादाचा लाभ घेतला. देवस्थान ट्रस्ट आणि उत्सव समितीचे पदाधिकारी आणि सभासदांनी कार्यक्रम यशस्वी होण्यासाठी परिश्रम घेतले.


‘प्रभात’चे फेसबुक पेज लाईक करा


ताज्या बातम्यांसाठी प्रभातचे मोबाईल अॅप डाऊनलोड करा

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)