मावळ : ‘डिझाईन’ आणि ‘फॅशन’मधील सबंधींविषयी मार्गदर्शन शिबिर

तळेगाव एमआयडीसी  -लोणावळा येथील एन. बी. नवले कॉलेज ऑफ कॉमर्स ऍण्ड सायन्स महाविद्यालयात डिझाईन आणि फॅशन क्षेत्रात करियर मार्गदर्शन शिबिर घेण्यात आले. पुणे येथील “उट लॅब’चे संचालक सुंदर वैद्यनाथन, अरुण खुटेकर आणि महाविद्यालयामधील बी.बी.ए., बी. कॉम आणि बी. सी. ए.चे विद्यार्थी उपस्थित होते. या वेळेस सुंदर वैद्यनाथन यांचे व्याख्यान संपन्न झाले. त्यामध्ये त्यांनी “भविष्यातील संधी आणि आव्हान’ आणि प्रवेश प्रक्रिया याची माहिती विद्यार्थ्यांना दिली.

उद्योग, व्यवसाय आणि औद्योगिक आस्थापनेमध्ये डिझाईनचे महत्व आणि जबाबदाऱ्या यांची सोदाहरण माहिती प्रभावीपणे सांगितली. डिझाईन क्षेत्रात भविष्यामध्ये मागणी वाढणार असल्याचे नमूद केले. प्राचार्य डॉ. जयवंत देसाई यांनी विद्यार्थ्यांनी वेगवेगळ्या क्षेत्रांमधील संधींचा अभ्यास केला पाहिजे. डिझाईनमधील संधीचा करिअर म्हणून फायदा करून घेतला पाहिजे, असे मत व्यक्‍त केले.

या शिबिराची जवाबदारी करिअर मार्गदर्शन विभागाचे सहाय्यक प्रा. इकबाल हवालदार, सहाय्यक प्रा. महेंद्र कुरकुटे आणि डॉ. नितीन जोशी यांनी संपन्न झाली.


‘प्रभात’चे फेसबुक पेज लाईक करा

What is your reaction?
0 :thumbsup:
0 :heart:
0 :joy:
0 :heart_eyes:
0 :blush:
0 :cry:
0 :rage:

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)