ह.भ.प. नंदकुमार महाराज शेटे यांना मावळ रत्न पुरस्कार

टाकवे बुद्रुक – शेटेवाडी येथील ह.भ.प. नंदकुमार महाराज शेटे यांना मावळ रत्न पुरस्काराने सन्मानीत करण्यात आले. तळेगाव दाभाडे येथे नुकत्याच आमदार बाळा भेगडे यांच्या वाढदिवसानिमित्त आयोजित करण्यात आलेल्या “जल्लोष सूर तालाचा’ या कार्यक्रमात महाराष्ट्र राज्याचे जलसंधारण मंत्री राम शिंदे व आमदार संजय बाळा भेगडे यांच्या हस्ते ह.भ.प. नंदकुमार महाराज शेटे यांना मावळरत्न पुरस्कार प्रदान करण्यात आला.

ह.भ.प शेटे महाराज हे उत्कृष्ट भजन गायक असून, त्यांनी जिल्हा व राज्यस्तरीय स्पर्धेत सहभाग घेऊन अनेक पारितोषिक मिळविली आहेत. दूरचित्रवाहिनीवरील “मन मंदिरा’ या कार्यक्रमात देखील त्यांना गायनासाठी आमंत्रित केले होते. यापूर्वीही त्यांना मावळ भूषण पुरस्काराने गौरवण्यात आले होते.


‘प्रभात’चे फेसबुक पेज लाईक करा

What is your reaction?
0 :thumbsup:
0 :heart:
0 :joy:
0 :heart_eyes:
0 :blush:
0 :cry:
0 :rage:

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)