पुणे-मुंबई द्रुतगतीवरील ‘ब्लॅक स्पॉट’चे 70 बळी!

File photo

प्रभात वॉच : अपघातांचे प्रमाण वाढढले : वाहतूक मार्गावरील “डेल्टा फोर्स’ची यंत्रणा अकार्यक्षम

-द्रूतगतीची लांबी : 11 किलोमीटर
-अपघातांची संख्या : 51
-मृत्यूंची संख्या : 70 हून अधिक

कामशेत – यशवंतराव चव्हाण पुणे-मुंबई द्रुतगती मार्गावर वाहनचालकांच्या हलगर्जीपणामुळे अनेक निष्पाप जीव गमविले आहेत. अपघाताचे प्रमाण घटत नसल्याने महामार्ग पोलीस यंत्रणा आणि द्रुतगती मार्गावर वाहतूक नियंत्रण करण्यासाठी नेमण्यात आलेली “डेल्टा फोर्स’ची यंत्रणा अकार्यक्षम ठरत आहे. गतवर्षी कामशेत पोलीस ठाण्याच्या हद्दीतील 11 किमोमीटर लांबीच्या अंतरामध्ये 51 वेगवेगळ्या अपघात 70 पेक्षा अधिक लोकांचा मृत्यू झाला होता.

-Ads-
दैनिक प्रभातचे फेसबुक पेज लाईक करा

पुणे-मुंबई द्रुतगती मार्गावरील साईट पट्ट्यावर लघुशंका करण्यासाठी, वाहनात बिघाड झाल्याने, चालकास विश्रांतीसाठी तसेच अशा अनेक कारणांसाठी हलकी व अवजड वाहने थांबत असतात. या थांबलेली वाहने वेगात येणाऱ्या वाहन चालकाच्या निदर्शनास न आल्याने वेगात येणारे वाहन मार्गावर उभ्या असणाऱ्या वाहनांना पाठीमागून जोरात धडक होते. वाढत्या भीषण अपघाताचे प्रमाण अलिकडे वाढत आहे. अशा प्रत्येक अपघातात वाहनातील दोन जणांचे जात आहेत. यामुळे महामार्गावर थांबणाऱ्या वाहनांवर महामार्ग पोलीस, डेल्टा फोर्स व स्थानिक पोलिसांनी कारवाई करणे गरजेचे आहे. अन्यथा द्रुतगती मार्गावरील अपघातांचे प्रमाण वाढेल, असे सांगण्यात येत आहे.

महामार्ग वाहतूक पोलिसांना सुविधांची वानवा

वाहतूक पोलिसांकडून वारंवार मार्गावर पेट्रोलिंग करण्यात येते, पण पेट्रोलिंग करण्यासाठी त्यांना दिलेल्या सरकारी वाहनाची दयनीय अवस्था झालेली आहे.ते वाहन धक्‍का देऊन कर्मचाऱ्यांना “ऍक्‍टिव्ह’ करावे लागते, यामुळे पोलिसांना अपघात झाल्यावर वेळेवर अपघातस्थळी देखील पोहचता येत नाही. तसेच वाहनास लागणारे इंधन कधी वेळेवर मिळत नाही. आवश्‍यकतेपेक्षा कमी मिळत असताना मार्गावर वारंवार पेट्रोलिंग करणे देखील शक्‍य होत नाही आणि त्यात मनुष्यबळ देखील कमी असल्याने वाहतूक पोलीस कर्मचाऱ्यांना रोज अनेक गैरसोईचा सामना करावा लागत आहे.

3 डिसेंबरला पहाटे पाच वाजल्याच्या सुमारास एक डंपर चालक त्याचा डंपर द्रुतगती मार्गावर लावून लागवीसाठी पाच मिनिटांसाठी खाली उतरला. याच वेळात एक वेगात येणाऱ्या मोटारीने डंपरला मागून जोरात धडक दिल्याने झालेल्या अपघातात मोटारीमधील दोघांचा जागीच मृत्यू झाला होता. यासारखे अपघात द्रुतगती मार्गावर वारंवार घडत असून, अशा अपघातात मृतांची संख्या जास्त असते, यामुळे असे अपघात थांबविण्यासाठी वाहतूक सुरक्षा यंत्रणांनी दक्ष राहणे गरजेचे आहे.

यशवंतराव चव्हाण द्रुतगती मार्गाच्या किवळेपासून ते खंडाळा घाटातील अमृतांजन पुलापर्यंत हद्दीची वाहतूक सुरळीत चालावी यासाठी महामार्ग वाहतूक पोलिसाचे 62 कर्मचारी आणि तीन अधिकारी तीन शिफ्टमध्ये कार्यरत आहेत. याशिवाय “डेल्टा फोर्स”चे कर्मचारी देखील वारंवार पेट्रोलिंग करत असतात.एव्हडी चोख व्यवस्था असताना देखील वाहने बेशिस्त व वाहतूक नियमांचे उल्लंघन करून धोकादायकपणे मार्गावर थांबतात. वाहन चालकांच्या या बेजबाबदारपणामुळे निष्पाप प्रवाशांना जीव गमवावा लागतो, यामुळे द्रुतगती मार्गावर कार्यरत असणाऱ्या वाहतूक यंत्रणेला अपयश येत असल्याचे दिसून येते.

वाहन पार्किंगची सोय गरजेची

द्रुतगती मार्गावर ठिकठिकाणी स्वच्छता गृह नसल्याने वाहनचालक कुठेही थांबतात आणि अपघातास कारणीभूत ठरतात. यामुळे मोठी टोलवसुली करणाऱ्या आरबीआयने द्रुतगती मार्गावर ठिकठिकाणी स्वच्छतागृह आणि वाहन पार्किंगची सोय करून देणे गरजेचे आहे.

“पुणे-मुंबई द्रुतगती मार्गावरील अपघात टाळण्यासाठी आम्ही पेट्रोलिंग करून मार्गावर उभ्या असणाऱ्या वाहनचालकांवर ‘नो पार्किंग’बाबत दंडात्मक कारवाई करतो. पण पेट्रोलिंग करणारे वाहन निघून गेल्यावर कोणी वाहन उभे केल्यास कारवाई करता येत नाही. त्यात मनुष्यबळ कमी असल्याने ठिकठिकाणी कर्मचारी उभे करणे शक्‍य होत नाही. याशिवाय शासनाच्या दिलेल्या वाहनात वारंवार बिघाड होत असल्याने आणि इंधन वेळेवर मिळत नसल्याने “पेट्रोलिंग’च्या फेऱ्या वाढविणे अशक्‍य होत आहे.
– दत्तात्रय गाढवे, वाहतूक पोलीस निरीक्षक, पुणे-मुंबई द्रुतगती मार्ग.


‘प्रभात’चे फेसबुक पेज लाईक करा

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)