मावळात थंडीचा कडाका वाढला

वडगाव मावळ : कडाक्‍याच्या थंडीने महाविद्यालयातील विद्यार्थ्यांनी शेकोटी पेटवून उब निर्माण करीत आहेत.

वडगाव मावळ – कडाक्‍याच्या थंडीने मावळ तालुका गारठला आहे. पारा गोठल्याने शेकोट्या पेटल्या, तर नागरिकांनी स्वेटर, कानटोपी, शाल व स्क्रॉपबाहेर काढले. थंडीच्या कडाक्‍याने पोल्ट्री उद्योग धोक्‍यात आला असून, कोंबड्यांचा मृत्यू होत आहे.

डिसेंबर महिन्यात मावळ तालुक्‍यात सकाळी 11 वाजेपर्यंत वातावरणात गारवा आहे. सायंकाळी पाच वाजताच पुन्हा वातावरणात गारवा निर्माण होत आहे. संध्याकाळ होताच ग्रामीण व शहरी भागातील तसेच महामार्ग ओस पडत आहेत. या थंडीमुळे उबदार कपडे खरेदी करण्यासाठी नागरिकांची झुंबड उडत आहे. थंडीमुळे उबदार कपड्यांची मागणी वाढल्याने किमंतीत वाढ झाली आहे.

-Ads-
दैनिक प्रभातचे फेसबुक पेज लाईक करा

या थंडीच्या कडाक्‍याने पोल्ट्रीतील कोंबड्यांचा मृत्यू झाला. पोल्ट्री व्यावसायिक धास्तावले आहेत. कुत्री रात्रीच्या वेळी बसण्यासाठी उबदार जागा शोधत आहेत. या थंडीमुळे ढगाळ वातावरण निर्माण झाले आहे. महामार्गाच्या लगत असलेल्या टपऱ्या, हॉटेल व ढाब्यावर शेकोट्या पेटवून वाहनचालक असल्याचे चित्र दिसत आहेत. सकाळी महाविद्यालयात येणारे विद्यार्थी सकाळी शेकोट्या पेटवून उब निर्माण करीत आहेत.


‘प्रभात’चे फेसबुक पेज लाईक करा


ताज्या बातम्यांसाठी प्रभातचे मोबाईल अॅप डाऊनलोड करा

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)