मावळ : सावली वृद्धाश्रमात आनंदोत्सव

तळेगाव दाभाडे – येथील सावली वृद्धाश्रम यांनी त्यांच्या 27 व्या वर्धापन दिनानिमित्त कलापिनीच्या तळेगावातील रसिकांसाठी मुंबई येथील मेघ-मल्हार वाद्य वृंदाचा हिट्‌स ओ. पी. नय्यर हा सुरेल कार्यक्रम झाला. दीप्ती रेगे आणि एम दत्ता या दोन गायकांनी आपके हसीन रुख पे आज नाय नूर है…, मेरा दिल मचल गया…, पुकारता चला हूँ मै…, बाबूजी धीरे चलना ला…, जरा होले होले चलो सजना… आँखोही आँखोमें इशारा होगया…, मांग के साथ तुम्हारा…, उडे जब जब झुल्फे तेरी…, यु तो हमने लाख हंसी देखे है…, ऐ दिल है मुश्‍कील जीना यहा… दिवाना हुआ बादल…, इशारो इशारोमे दिल लेने वाले…, ये देश है वीर जवानोंका… या सारखी ओ. पी. नय्यर यांची अनेक अवीट गाणी सादर करून रसिकांना मंत्रमुग्ध केले.

रसिकांना ठेका धरायला लावला. या गाण्यांना तेवढीच सुरेल साथ मिलिंद परांजपे (सिंथ), स्वप्नील पंडित (ताल-वाद्य-तबला), मोहिते (ऍक्‍टोपॅड) यांनी केली आणि मंदार खराडे यांनी रसिकांची मने जिंकली. मंगेश पाडगावकर, मोहन जोशी, अरुण गुजराथी, विना वर्ल्डच्या वीणाताई पाटील यांच्या मुलाखती, गाण्यांचे अवीट कार्यक्रम, द्वारकानाथ संझगिरी यांचे शम्मीकपूर, देवानंद, गुरुदत्त यांच्या दृक्‍श्राव्य कारकीर्दीचा आढावा असे अनेक उत्तोमोत्तम कार्यकम सादर झाले.

-Ads-
दैनिक प्रभातचे फेसबुक पेज लाईक करा

तळेगावकर रसिक नेहमीच 1 जानेवारीची वाट पहात असतात. कलापिनीचे श्रीशैल गद्रे, विश्‍वास देशपांडे आणि तळेगावचे स्वास्थ्य गुरू अशोक बकरे व सावली वृद्धाश्रमाचे संचालक चांद आमडेकर आणि अभय आमडेकर उपस्थित होते.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)