मावळ तालुका खाण व क्रशर उद्योजक संघातर्फे आंबळेच्या विकासासाठी निधी

वडगाव मावळ – मावळ तालुका खाण व क्रशर उद्योजक संघ यांच्या वतीने आंबळे ग्रुप ग्रामपंचायतीस 23 लाखांचा निधी सुपूर्त केला. ग्रामपंचायतीमध्ये समाविष्ट गावे आंबळे, मंगरूळ, कदमवाडी आणि शेटेवाडी यांच्या पायाभूत सुविधा विकासाकरीता आणि उभारण्यात करीता देण्यात आला. क्रशर उद्योजक यांनी या गावाप्रती सामाजिक बांधिलकी जपत आंबी ते खराळ ओढा आंबळे सुमारे 4.4 किलोमीटर लांबीचा रस्ता 4.5 कोटी रुपये खर्च करून तीन वर्षांपूर्वी बनविलेला आहे. याशिवाय या ग्रामपंचायत हद्दीत असणारी शैक्षणिक इमारत उभारणे, शैक्षणिक साहित्य देणे, गाव मंदिरे यांच्या उभारणीस भरघोस मदत करणे अशी आणि अनेक समाजोपयोगी कामे क्रशर उद्योजक करीत आहेत.

स्टोन क्रशर संघटनेचे अध्यक्ष विलास काळोखे यांनी या ग्रामविकास निधीच्या रक्‍कमेचे धनादेश सर्व ग्रामस्थांच्या उपस्थित आमदार बाळा भेगउे यांच्या व संरपंच व इतर पदाधिकारी यांच्याकडे सपुरद केला. या कार्यक्रमाची प्रस्तावना सरपंच मोहन घोलप यांनी केली.

-Ads-
दैनिक प्रभातचे फेसबुक पेज लाईक करा

पंचायत समितीचे उपसभापती शांताराम कदम यांनी आंबळे ग्रामपंचायतीस अधिकाधिक निधी मिळवण्या करिता प्रयत्न करू, असे आश्‍वासन दिले. याशिवाय क्रशर उद्योजक नेहमीच ग्रामपंचायतीसाठी मदत करतात. निधी उपलब्ध करून देतात आणि सर्व क्रशर व्यवसायिक हे स्थानिक असून, त्यांच्या व्यवसायास शुभेच्छा दिल्या.

संघटनेचे अध्यक्ष विलास काळोखे यांनी आपले मनोगत व्यक्‍त करताना सर्व ग्रामस्थ यांना आम्ही आपल्या मदतीसाठी नेहमीच कटिबद्ध असू असे आश्‍वासन दिले. या वेळी सागर पवार, किरण काकडे, सुधाकर शेळके, संदीप काळोखे, श्रीकांत वायकर, सतीश कलावडे, उपसभापती शांताराम कदम, सरपंच मोहन घोलप, नवनाथ मोढवे व सर्व ग्रामस्थ उपस्थित होते.


‘प्रभात’चे फेसबुक पेज लाईक करा


ताज्या बातम्यांसाठी प्रभातचे मोबाईल अॅप डाऊनलोड करा

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)