पवनानगर ते कामशेत दर तासाला धावणार ‘यशवंती’

पवनानगर – पवनानगर परिसरात महाविद्यालय, शाळा ,शासकीय कार्यालय असल्याने शासकीय अधिकारी, बॅक कर्मचारी, विद्यार्थी,नोकरदार पवनानगर मध्ये येत असतात तसेच पवनानगर येथून नोकरदार शालेय विद्यार्थी शिक्षणासाठी कामशेत येथे जात असतात. दोन्ही भागातील नागरिकांना प्रवासी वाहनांची दोन-दोन तास प्रतीक्षा करावी लागत असे. सार्वजनिक वाहतूक व्यवस्था सक्षम करावी, अशी गेल्या कित्येक दिवसांपासून मागणी होत होती. अखेर या मार्गावर दर तासाला “यशवंती’ बस सुरू करण्यात आली आहे.

पवनानगर-कामशेत, कामशेत-पवनानगर प्रवासाठी एसटीची व प्रवासी वाहनांची दोन ते तीन तास प्रतिक्षा करावी लागत होती व पवनानगर येथे महाविद्यालय असल्याने येथे येणाऱ्या विद्यार्थ्यांना एसटीसाठी खूप वेळ प्रतिक्षा करावी लागत असे. तसेच शालेय विद्यार्थ्यांना देखील रोज सकाळी शाळेत येण्यासाठी उशीर होत असे.

-Ads-
दैनिक प्रभातचे फेसबुक पेज लाईक करा

मात्र दर तासाला यशवंती बससेवा सुरू झाल्याने विद्यार्थ्यांची ही चिंता मिटली आहे व या एसटी सुरू झाल्याने विद्यार्थ्यांबरोबरच नागरिकांनी, व पालकांनी देखील आनंद व्यक्‍त केला आहे. ही बससेवा सुरू झाल्याने नागरीकांचा वेळही वाचणार आहे.

पवनानगर चौकात असणाऱ्या एस टी स्टॅंड मध्ये पवनानगर ते तळेगाव, कामशेत कडून येणाऱ्या एसटी चे वेळापत्रक देखील लावण्यात यावे, अशी मागणी प्रवासी करत आहेत.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)