मावळ : कामशेतमध्ये युवा शक्‍तीचा अनोखा उपक्रम

युवा दिन : राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या वतीने स्वच्छता मोहीम

नाणे मावळ  – राष्ट्रीय युवा दिनाचे औचित्य साधून राष्ट्रीय स्वयंसेवक संघ, कामशेत शहराच्या वतीने सामाजिक जाणिवेतून स्वच्छता मोहीम यशस्वीपणे पार पाडली. श्रीलक्ष्मी शारदा संकुल येथील प्रभात शाखा संपन्न झाली. त्यानंतर 35 स्वयंसेवकांनी नाणे मावळची जीवन वाहिनी इंद्रायणी मातेची आरती केली. त्यांनतर नदीपात्रातील कचरा/कपडे, वाढलेले गवत, प्लॅस्टिक व पालापाचोळा गोळा केला.

स्मशान भूमी, सर्व घाटवरील पायऱ्या व परिसर झाडून स्वच्छ केला. संघाच्या स्वयंसेवकांना या कामासाठी कामशेत ग्रामपंचायतीची कचरागाडी उपलब्ध झाली होती. तसेच ग्रामपंचायतीच्या कर्मचारी वर्गानेही या कार्याला सहकार्य केले. तसेच स्वच्छतेविषयी माहितीपर दोन फलक कायमस्वरुपी तेथे लावण्यात आले. सर्वांनी मनापासून या सेवा अभियानात भाग घेतला.

राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या स्वयंसेवकांनी स्वयंप्रेरणेने केलेल्या या कार्यामुळे कामशेतमधील नागरिकांमधून त्यांचे कौतुक झाले. देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या विचारातील “एक कदम स्वच्छता की ओर’ ही संकल्पना यानिमित्ताने अनुभवता आली, अशी भावना स्वयंसेवकांनी व्यक्‍त केली.


‘प्रभात’चे फेसबुक पेज लाईक करा

What is your reaction?
0 :thumbsup:
0 :heart:
0 :joy:
0 :heart_eyes:
0 :blush:
0 :cry:
0 :rage:

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)