मावळ : लोणावळ्यात शालेय विद्यार्थिनींना मोफत एसटी बस पासचे वाटप

लोणावळा – शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्या संकल्पनेतून तसेच महाराष्ट्र राज्य परिवहन मंत्रालय व परिवहन मंत्री दिवाकर रावते यांच्या पुढाकाराने महाराष्ट्र राज्यात सुरू झालेल्या पहिली ते बारावीपर्यंतच्या विद्यार्थिनींना मोफत मासिक एस.टी. बस पास योजनेअंतर्गत लोणावळा शहरातील शालेय विद्यार्थींनीना मोफत मासिक एस.टी. पासचे वाटप करण्यात आले.

या योजनेचा शुभारंभ युवा सेना मावळ संपर्क प्रमुख, विस्तारक तसेच मुंबई विद्यापीठ राज्यपाल नियुक्‍त सिनेट सदस्य ऍड. वैभव थोरात यांच्या मार्गदर्शनाखाली करण्यात आली. युवासेना व भारतीय विद्यार्थी सेना तसेच युवतीसेनेच्या पदाधिकाऱ्यांनी संपूर्ण मावळ परिसरातील विद्यालय व महाविद्यालयात जाऊन संबंधित योजनेची माहिती देऊन गरजू विद्यार्थीनांना या योजनेचा लाभ मिळवून दिला. या योजने अंतर्गत लोणावाळा शहरातील डी.सी. हायस्कूल, खंडाळ, व्हि. पी. एस. विद्यालय व कनिष्ठ महाविद्यालय तसेच लोणावळा कनिष्ठ महाविद्यालय व बालग्राम विद्यालय लोणावळा या विद्यालयात व कनिष्ठ महाविद्यालयात मोफत पास वाटप करण्यात आले.

-Ads-
दैनिक प्रभातचे फेसबुक पेज लाईक करा

या वेळी शिवसेना पुणे जिल्हा महिला संघटिक आणि विरोधी गटनेत्या शादान चौधरी, मावळ विधानसभा युवासेना समन्वयक शाम उत्तम सुतार, प्रफुल राजपूत, धीरज मोहोळ, मयुर भिंताडे तसेच महाविद्यालयाच्या वतीने प्राचार्य बी. एन. पवार, प्रा. सविता पाटोळे, प्रा. दिपक तारे, प्रा. राहुल सदवर्ते, शशिकला ठाकर आणि शिक्षक वृंद उपस्थित होते. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन प्रा. दिपक तारे यांनी केले. कार्यक्रमाचे प्रस्ताविक शाम सुतार यांनी केले. प्रा. सविता पाटोळे यांनी आभार मानले.


‘प्रभात’चे फेसबुक पेज लाईक करा


ताज्या बातम्यांसाठी प्रभातचे मोबाईल अॅप डाऊनलोड करा

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)