मावळ लोकसभा : पार्थ पवार यांचा मावळ मधून उमेदवारी अर्ज दाखल

मावळ – मावळ लोकसभा मतदारसंघातून आज राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे उमेदवार आणि राज्याचे माजी मुख्यमंत्री अजित पवार यांचे सुपुत्र पार्थ पवार यांनी आपला उमेदवारी अर्ज दाखल केला आहे. यावेळी अजित पवार हे देखील उपस्थित होते. मावळ येथे पार्थ पवार यांच्यासमोर शिवसेनेचे श्रीरंग बारणे याचं आव्हान असणार आहे.

पार्थ पवार यांनी अर्ज दाखल करण्यापूर्वी राष्ट्रवादी काँग्रेसने रॅली आयोजित केली होती. याप्रसंगी राष्ट्रवादीचे नेते आणि विधिमंडळ पक्षनेते अजित पवार यांनी भाजपच्या जाहीरनाम्यावर टीका केली. महाआघाडीचा जाहीरनामा हा सर्व समाजघटकांचा विचार करून बनवलेला असल्याचे त्यांनी सांगितले. तर भाजपचा जाहीरनामा हा अर्धवट असल्याचे ते म्हणाले.

Ads

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here