माजी उपमुख्यमंत्री अजित पवार : तळेगाव दाभाडे येथे “निर्धार परिवर्तनाचा’ जाहीर सभा
मावळात परिवर्तनाची लाट…
संत तुकाराम सहकारी साखर कारखान्याचे उपाध्यक्ष बापूसाहेब भेगडे म्हणाले की, मावळ तालुक्याचा विकास केवळ कागदोपत्री असून, जनतेची फसवणूक केली जात आहे. मावळ तालुक्यात धरणग्रस्तांचे पुनर्वसन, इंद्रायणी नदी प्रदूषण, टाकवे बुद्रुक औद्योगीक क्षेत्रातील कंपन्यांचे स्थलांतर, महामार्गावरील उड्डाणपूल, ग्रामीण भागातील रस्त्यांची दुरवस्था, वाढीव कर केवळ विविध विकास कामांचे उद्घाटन आणि भूमिपूजन केले जात आहे. शेतकऱ्यांच्या जमिनी घेऊन स्थानिक भूमिपुत्रांना नोकऱ्या दिल्या जात नाहीत. मावळच्या परिवर्तनासाठी तसेच विकाससाठी मावळ लोकसभा व विधानसभेसाठी परिवर्तन करून राष्ट्रवादीचाच खासदार आणि आमदार निवडून द्या.
तळेगाव दाभाडे – बॅंकेचे अधिकारी शेतकऱ्यांच्या पत्नीला शरीर सुखाची मागणी करत आहेत. सरकार काय करतं? सरकारला धडा शिकवता येत नाही का? तुम्ही काही करा हवं, तर कायदा कडक करा मात्र, अशा मुजोरांना धडा शिकवा. अपूर्ण कामांचे घाईघाईने उद्घाटन केले जात आहे.
माऊली-तुकारामांपेक्षा मनुचे विचार श्रेष्ठ होते, असा संभाजी भिडे म्हणतो त्याचे धाडस कसे होते? आणि आपण सहन तरी कशी करतो? मावळ लोकसभा आणि विधानसभेची जागा आगामी निवडणुकांसाठी राष्ट्रवादी कॉंग्रेसच्या वाट्याला आली आहे. राष्ट्रवादी कॉंग्रेस पक्ष जो उमेदवार देईल त्यालाच निवडून आणण्यासाठी प्रयत्न करा, असे प्रतिपादन माजी उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी केले.
तळेगाव येथील मारुती मंदिर चौकात मावळ तालुका राष्ट्रवादीने आयोजित केलेल्या निर्धार परिवर्तनाचा या जाहीर सभेत ते बोलत होते.
या वेळी राष्ट्रवादी कॉंग्रेसचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील, ज्येष्ठ नेते छगन भुजबळ, माजी मंत्री दिलीप वळसे, माजी राज्यमंत्री मदन बाफना, विधान परिषदेचे विरोधी पक्षनेते धनंजय मुंडे, माजी आमदार कृष्णराव भेगडे, जयदेव गायकवाड, जिल्हाध्यक्ष प्रदीप गारटकर, जालिंदर कामठे, विजय कोलते, संत तुकाराम सहकारी साखर कारखान्याचे उपाध्यक्ष बापूसाहेब भेगडे, तालुकाध्यक्ष बबनराव भेगडे, अर्चना घारे, ज्येष्ठ नगरसेवक किशोर भेगडे, नगरसेवक संतोष भेगडे, माया भेगडे, शहराध्यक्ष गणेश काकडे, पुणे युवकचे अध्यक्ष सचिन घोटकुले, शोभा कदम, हेमलता काळोखे, ऍड. विजय पाळेकर, अंकुश आंबेकर, दीपक हुलावळे, सुनील दाभाडे, कैलास गायकवाड, अशोक घारे, आशिष खांडगे आदी उपस्थित होते. ज्येष्ठ नेते छगन भुजबळ, जयंत पाटील, धनंजय मुंडे यांनी मनोगत व्यक्त केले.
संयोजन राष्ट्रवादी तालुकाध्यक्ष बबनराव भेगडे, संत तुकाराम सहकारी साखर कारखाना उपाध्यक्ष बापूसाहेब भेगडे, ज्येष्ठ नगरसेवक किशोर भेगडे, माजी उपनगराध्यक्ष गणेश काकडे, नगरसेवक संतोष भेगडे, राष्ट्रवादी युवक जिल्हा अध्यक्ष सचिन घोटकुले, राष्ट्रवादी युवक तालुकाध्यक्ष सुनील दाभाडे, कैलास गायकवाड, सुनील भोंगाडे, स्वामी गायकवाड, आशिष खांडगे, नवनाथ चोपडे आदींनी केले. प्रास्ताविक तालुकाध्यक्ष बबनराव भेगडे यांनी केले. सूत्रसंचालन ज्येष्ठ नगरसेवक किशोर भेगडे यांनी केले. राष्ट्रवादी मावळ तालुका कार्याध्यक्ष दीपक हुलावळे यांनी आभार मानले.
‘प्रभात’चे फेसबुक पेज लाईक करा