माऊली परतुनी आली अलंकापुरी !

छायाचित्र :सागर येवले

तब्बल 30 दिवसांनंतर ज्ञानियांचा राजा लाखो वैष्णवांसमवेत आलंकापुरीत दाखल

ज्ञानोबा-तुकोबाच्या जयघोषाने परिसर दुमदुमला

-Ads-
दैनिक प्रभातचे फेसबुक पेज लाईक करा

एम. डी. पखरे

 

माझ्या जिवाची आवडी ।
पंढरपुरी नेऊनि गुढी ।।
गजर विठुचा करोनि दारोदारी,
माऊली परतुनी आली ।
स्वगृही तयाच्या अलंकापुरी ।।

या पंक्‍तीनुसार तब्बल 30 दिवस ज्ञानोबा-तुकोबाचा गजर व मुखी विठुचे नामस्मरण करीत लाखो वैष्णवांसमवेत ज्ञानियांचा राजा, श्री संतश्रेष्ठ ज्ञानेश्‍वर महाराजांच्या पालखी सोहळ्याचे आज (मंगळवारी) सायंकाळी साडेपाच वाजता अलंकापुरीत आगमन झाले. यावेळी माऊलींच्या जयघोषाने अवघी अलंकापुरी दुमदुमली होती.

आषाढी एकादशीला विठु भेट झाल्यानंतर चार दिवसांच्या मुक्कामानंतर माऊलींचा परतीचा प्रवास सुरू झाला. तर आज सायंकाळी पुंडलिक वरदे, हरिविठ्ठलाचा गजर अलंकापुरीत घुमला अन्‌ वेशीवर म्हणजेच जुन्या पुलावर पालखी येताच देवस्थानतर्फे दहिभाताचा नैवेद्य घेऊन हजारो भाविकांसह माऊलींच्या पालखीने अलंकापुरीत प्रवेश केला. दरम्यापन, आज दुपारी माऊलींची पालखी परतीच्या मार्गावरीलअखेरच्या विसाव्यासाठी थोरले पादुका (साई मंदिर) येथे तब्बल दीड तास थांबल्याने थोरले पादुका देवस्थान ट्रस्टचे अध्यक्ष ऍड. विष्णू तापकीर व समस्त वडमुखवाडीकरांच्या वतीने पालखीतील पादुकांना पुष्पहार अर्पण करून सर्व विश्‍वस्त, मानकरी, टाळकरी, दिंडीकरी व वारकऱ्यांचे स्वागत करण्यात आले.

सायंकाळी साडेपाच वाजता पालखी धाकटे पादुका येथे येताच प्रतिवर्षी प्रमाणे देवकृपा सर्व्हिस स्टेशनचे प्रकाश काळे यांनी प्रथम पालखीचे स्वागत करून वारकऱ्यांना चहा फराळाचे वाटप करण्यात आले.त्याचबरोबर स्वकाम सेवा मंडळाने देखील महाप्रसाद व चहाचे वाटप करण्यात आल्याचे मंडळाचे अध्यक्ष सुनिल तापकीर यांनी सांगितले.

पालखी आळंदीच्या वेशीवर येताच दही-भाताचा नैवेद्य उमेश बीडकर यांच्या वाड्यासमोर देण्यात येऊन, पुंडलिक वरदे, हरि विठ्ठलाचा गजर करीत हजारो आळंदीकरांसमवेत पालखी वेशीतून नगरपरिषद चौकातून रामघाट, विष्णुमंदिर हरिहरेंद्र स्वामी मठावरून पाण दरवाजाने पालखी सोहळा मंदिरात विसावला. तेथे संस्थांच्या वतीने मानकऱ्यांना नारळ प्रसादाचे वाटप करण्यात आली.

चौकट : आज सांगता
आषाढी एकादशीनिमित्त बुधवारी (दि. 8) दुपारी बारा वाजता पालखी नगरप्रदक्षिणेसाठी मंदिरातून बाहेर पडून हजेरी मारूती मंदिरात हजेरी होऊन त्याठिकाणी देवस्थानांचे वतीने सर्व मानकऱ्यांना नारळ प्रसादाचे वाटप करून आषाढी वारीची सांगता करण्यात येईल.
आळंदी (ता. खेड) : नगरपरिषद चौकात पालखी येताच पुंडलिक वरदे हरि विठ्ठलाच्या गजराने अवधी अलंकापुरी दुमदुमली होती.


‘प्रभात’चे फेसबुक पेज लाईक करा


ताज्या बातम्यांसाठी प्रभातचे मोबाईल अॅप डाऊनलोड करा

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)