माथाडी संघटना उदयनराजेंच्या पाठीशी

सातारा – माथाडी हॉस्पिटल, पतपेढी मोडीत काढण्याससह माथाडींचा रोजगार हिसकावून घेत थेट बाजारपेठेच्या माध्यमातून माथाडी संघटना मोडीत काढण्याचा प्रयत्न शिवसेना-भाजप युती सरकारने केला. त्यामुळे माथाडी संघटनेने सातारा लोकसभा मतदारसंघातील कॉंग्रेस राष्ट्रवादी व मित्रपक्ष आघाडीचे उमेदवार खा. श्री. छ. उदयनराजे भोसले यांच्या पाठीशी राहण्याचा निर्णय घेतला आहे, अशी माहिती माथाडी कामगार संघटनेचे नेते ऋषीभाई शिंदे यांनी पत्रकार परिषदेत दिली.

ऋषीभाई शिंदे पुढे म्हणाले, शिवसेना-भाजप, आरपीआय युतीचे उमेदवार नरेंद्र पाटील यांनी माथाडी संघटनेला विश्‍वासात न घेता भाजपमधून शिवसेनेत प्रवेश करीत भगवा झेंडा आपल्या खांद्यावर घेतला. शिवसेना-भाजप युतीने आपल्या काळात माथाडी संघटनेची मुस्कटदाबी केली. माथाडी संघटनेचे हॉस्पिटल पतपेढी ताब्यात घेण्याचा प्रयत्न केला. त्याठिकाणी पल्या विचाराच्या अधिकाऱ्यांची नेमणूक केली. ही बाब संघटनेला मान्य नसल्याने संघटनेने राष्ट्रवादी सोबत जाण्याचा निर्णय घेतला. राष्ट्रवादी कॉंग्रेसने आघाडी सरकारच्या काळात संघटनेला विविध योजनांचा लाभ मिळवून दिला. माथाडींच्या कायद्यात आवश्‍यक तो बदल केला. उदयनराजे भोसले यांच्यामध्ये आम्ही शिवाजीराव पाटील यांची प्रतिमा पाहतो.
माथाडी संघटना उदयनराजेंच्या पाठीशी

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)