सामना जिंकून मालिका बरोबरीत करू – कृणाल पांड्या

बेंगळुरू:  मागील टी- 20 सामना भारतीय संघाने सांघीक कामगिरी करत जवळजवळ जिंकलाच होता, परंतु अखेरच्या षटकात मॅक्‍सवेलने तो सामना ऑस्ट्रेलियाच्या बाजूने झुकवाला. त्यामुळे भारताला पराभव स्वीकारावा लागला. खरे सांगायचे झाले तर क्रिकेट हा अनिश्‍चिततेचा खेळ आहे. यामध्ये एखादा संघ जिंकेल असे भाकीत करता येत नाही. असे असले तरी भारतीय संघ हा सामना जिंकून मालिका बरोबरीत करेल आणि एकदिवसीय मालिकेतही चांगली कामगिरी करेल. याची मला खात्री आहे. भारतीय संघ हा चांगला खेळ करत आहे. त्यामुळे भारतीय संघाने सामना जिंकण्याच्या संधी जास्त आहे, असे मत भारताचा अष्टपैलू खेळाडू कृणाल पांड्याने दुसऱ्या टी- 20 सामन्यासाठी आयोजित केलेल्या पत्रकार परिषदेमध्ये व्यक्त केले आहे.

चिनास्वामी मैदानाच्या खेळपट्टी विषयी बोलताना म्हणाला, ही खेळपट्टी कोरडी आणि सपाट असल्याने येथे जास्त धावा जमवता येतील. मागील सामन्यात आम्ही मोठी धावसंख्या उभारण्यात कामी पडलो होतो. या सामन्यात चित्र वेगळे असेल. या मैदानावर खेळण्याचा अनुभवही असल्याने आम्ही याचा फायदा घेणार आहोत. पहिल्या सामन्यात आमच्या गोलंदाजांनी चांगली कामगिरी केली होती. तर त्याचे काही फलंदाज मोक्‍याच्यावेळी धावबाद झाल्याचाही आम्हाला फायदा झाला होता. परंतु, अखेरच्या षटकात आम्हाला सामना गमवावा लागला. आम्ही सांघिक खेळाच्या जोरावर हा सामना जिंकू. संघाचे हीत लक्षात घेत मी कोणत्याही स्थानावर फलंदाजी करण्यास तयार आहे. ही मालिका विश्वचषकात भारतीय संघात स्थान मिळवण्याच्या दृष्टीने खूप महत्त्वाची आहे, असेही तो यावेळी म्हाणाला.
.

-Ads-
दैनिक प्रभातचे फेसबुक पेज लाईक करा

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)