#हाॅकी_विश्वचषक_स्पर्धा_2018 : भारत-बेल्जियम सामना बरोबरीत

भुवनेश्वर : शेवटच्या पाच मिनिटात गोल स्वीकारावा लागल्याने भारताला आपल्या दुसऱ्या सामन्यात बेल्जियमशी बरोबरीवर समाधान मानावे लागले. भारतासाठी हरमनप्रीत सिंह आणि सिमरनजीत सिंग याने गोल नोंदवले. विश्‍वचषक स्पर्धेत भारताचा हा दुसरा सामना होता. पहिला सामना भारताने दक्षिण अफ्रिकेविरुद्ध जिंकला होता.

पहिल्या सत्राच्या सुरुवातीला बेल्जियम संघाने केलेल्या आक्रमक खेळाचा फायदा घेत त्यांच्या ऍलेक्‍सझांडर हेन्रीक्‍सने 8 व्या मिनिटाला गोल करत बेल्जीयमला आघाडी मिळवून दिली. त्यानंतर भारतीय संघाने पेनल्टी कॉर्नरचा फायदा घेत गोल नोंदवला आणि सामना 1-1 असा बरोबरीत आणला.

तर, 47 व्या मिनिटाला सिमरनजीत सिंगने गोल करत भारताला 2-1 अशी आघाडी मिळवून दिली. परंतु, सामना संपण्यास 5 मिनिटे बाकी असताना बेल्जियमने गोल करत बरोबरी साधली आणि सामना 2-2 असा बरोबरीत सुटला.


‘प्रभात’चे फेसबुक पेज लाईक करा

What is your reaction?
0 :thumbsup:
0 :heart:
0 :joy:
0 :heart_eyes:
0 :blush:
0 :cry:
0 :rage:

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)