इंडोनेशिया नैसर्गिक आपत्ती : हजारापेक्षा अधिक मृतदेहाचे सामूहिक दफन

जकार्ता (इंडोनेशिया) – इंडोनेशियातील सुलावेसी बेटाला शुक्रवारी शक्तिशाली भूकंपाचा धक्का बसला. या भूकंपाची तीव्रता रिश्‍टर स्केलवर 7.5 एवढी होती. यानंतर आलेल्या त्सुनामीच्या तडाख्यामुळे आणि भूंकपामुळे हजारो लोक मरण पावले आहेत.

भूकंप आणि त्सुनामी यांंचा फटका बसलेल्या आणि अधिक प्रभावित झालेल्या सुलावेसीमध्ये  स्वयंसेवकांनी सोमवारी एक हजारापेक्षा अधिक मृतदेहांचा दफनविधी करण्यासाठी सामूहिक कब्र खोदली आहे. आपत्तीमुळे मोठ्या प्रमाणात झालेल्या जीवीतहानी आणि वित्तहानी यातून सावरण्याचा प्रयत्न करत असलेल्या  इंडोनेशियातील अधिकाऱ्यांनी आंतरराष्ट्रीय मदत मागितली आहे.

-Ads-

नैसर्गिक आपत्तीच्या चार दिवसानंतर सुध्दा दूरच्या परिसरात तसेच इतर क्षेत्रात संपर्क होऊ शकत नाही. अौषधे संपत आली असून अौषधाचा तुटवडा होत आहे. बचावकार्यादरम्यान गाळाखाली अडकलेल्या पीडिताना बाहेर काढण्यासाठी लागणाऱ्या उपकरणाची कमी जाणवत आहे. त्यामुळे आंतरराष्ट्रीय मदत मागितली जात आहे.


‘प्रभात’चे फेसबुक पेज लाईक करा

What is your reaction?
4 :thumbsup: Thumbs up
8 :heart: Love
33 :joy: Joy
12 :heart_eyes: Awesome
10 :blush: Great
200 :cry: Sad
9 :rage: Angry

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)