अश्‍विनची ती कृती खिलाडूवृत्तीच्या विरुद्ध : मेरिलबोन क्रिकेट क्‍लब

मेरिलबोन क्रिकेट क्‍लब (एमसीसी) चा घुमजाव

लंडन -राजस्थान रॉयल्सविरुद्धच्या सामन्यात पंजाबचा कर्णधार रविचंद्रन अश्‍विनने जोस बटलरला मंकडिंग पद्धतीने बाद केले होते. या प्रकारानंतर अश्‍विनवर जोरदार टीका होऊ लागली होती. दरम्यान, क्रिकेटच्या नियमांचे संरक्षक मानल्या जाणाऱ्या मेरिलबोन क्रिकेट क्‍लब अर्थात एमसीसीनेही या प्रकाराची समीक्षा केल्यानंतर अश्‍विनने केलेले कृत्य खिलाडूवृत्तीच्या विरोधात असल्याचे मत मांडले आहे.

दरम्यान, यापूर्वी एमसीसीने या कृतीला विरोध दर्शवला नव्हता. नॉन स्ट्राइकला उभ्या असलेल्या फलंदाजाला मंकडिंग करण्यापूर्वी इशारा देण्यात यावा, असे क्रिकेटच्या कुठल्याही नियमात नोंद केलेले नाही. असे एमसीसीन त्यावेळी म्हटले होते.

अश्‍विनने राजस्थानचा स्फोटक फलंदाज जोस बटलरला मंकडिंग पद्धतीने धावबाद केले होते. मात्र, एमसीसीने सुरुवातीला अश्‍विनचे समर्थन केले होते. आता मात्र एमसीसीने याबाबत आपली भूमिका बदलली असून अश्‍विनवर टिका केली आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)