ऑलिम्पिकमध्ये सुवर्ण मिळवणे हे माझे ध्येय : मेरी कोम

नवी दिल्ली – भारताची स्टार महिला बॉक्‍सर मेरी कोमने विक्रमी सहावे अजिंक्‍यपद पटकाविले आहे. बुधवारी एका कार्यक्रमात तिने सांगितले की, मी 2012 ऑलिम्पिकमध्ये पदक जिंकले होते. परंतु, त्यावेळी मला कांस्यपदकावर समाधान मानावे लागले होते. माझे पुढील लक्ष्य हे टोकीयो ऑलिम्पिकमध्ये सुवर्णपदक जिंकणे आहे.

या कार्यक्रमावेळी उपस्थित असलेल्या केंद्रीय महिला आणि बाल कल्याणमंत्री मेनका गांधी यांनी मेरी कोमला “राष्ट्रीय संपत्ती’ म्हणुन तिचे कौतुक केले. पुढे त्या म्हणाल्या, मेरी कोमने सहावे विजेतेपद जिंकल्यामुळे आम्ही खूप आनंदी आहोत. आपल्या पारदर्शक खेळाने आणि खिलाडूवृत्तीने मेरी कोमने लहानमुलांसमोर आदर्श ठेवला आहे.

-Ads-

35वर्षीय मेरी कोमने पुढे सांगितले की, माझ्यासाठी सराव खूपच महत्वाचा आहे. जर माझे 2-3 सराव सत्रे जरी आयोजित असतील तर मी पूर्णपणे त्या सराव सत्रांना हजेरी लावण्याचा प्रयत्न करते आणि त्यांचा योग्य उपयोग करण्यावर माझा अधिक भर असतो.


‘प्रभात’चे फेसबुक पेज लाईक करा

What is your reaction?
0 :thumbsup: Thumbs up
0 :heart: Love
0 :joy: Joy
0 :heart_eyes: Awesome
0 :blush: Great
0 :cry: Sad
0 :rage: Angry

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)