जागतिक महिला बाॅक्सिंग स्पर्धा : मेरी कोमची उपांत्य फेरीत धडक

नवी दिल्ली – भारताची आघाडीची महिला बाॅक्सिंगपटू एमसी मेरी कोम हिने मंगळवारी एआयबीए जागतिक महिला बाॅक्सिंग स्पर्धेत आपले सातवे पदक निश्चित केले आहे. पाचवेळची जागतिक विजेती मेरी कोमने बाॅक्सिंग स्पर्धेतील 48 किलो गटात चीनच्या वू यू हिचा 5-0 असा पराभव करत उपांत्यफेरीत प्रवेश केला आहे.

उपांत्यफेरीत ऑलिम्पिक कांस्य पदक विजेती भारतीय महिला बाॅक्सिंगपटूचा  सामना उत्तर कोरियाच्या की किम ह्यांग मी हिच्याशी गुरूवारी होणार आहे. मेरी कोम हिने किम ह्यांग मी हिला मागील वर्षी झालेल्या आशियाई स्पर्धेत पराभूत केले होते.

-Ads-


‘प्रभात’चे फेसबुक पेज लाईक करा

What is your reaction?
0 :thumbsup: Thumbs up
0 :heart: Love
0 :joy: Joy
0 :heart_eyes: Awesome
0 :blush: Great
0 :cry: Sad
0 :rage: Angry

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)