मेरी कोम सुवर्ण इतिहास रचण्यापासून केवळ एक पाऊल दूर

नवी दिल्ली – भारताची बॉक्‍सर मेरी कोम दहाव्या एआईबीएमधील महिला राष्ट्रीय चॅम्पियनशीपमध्ये अंतिम फेरीत पोहचली असून सुवर्ण इतिहास रचण्यापासून केवळ एक पाऊल दूर आहे. उपांत्य फेरीतील लढतीत मेरी कोमने कोरियाच्या किम हयांग हिचा 5-0 ने पराभव केला आहे.

अंतिम फेरीत तिचा सामना युक्रेनच्या  हेना अोखोता हिच्याशी होणार आहे. हेना अोखोता हिने जापानच्या वाडा हिचा उपांत्यफेरीत पराभव करत अंतिम फेरी गाठली आहे.

त्यामुळे मेरीचे सातवे आंतरराष्ट्रीय पदक निश्चित झाले आहे. तिने महिला राष्ट्रीय चॅम्पियनशीपमध्ये सहा पदके जिंकली असून त्यामध्ये पाच सुवर्ण आणि एक रौप्यपदकाचा समावेश आहे. मेरी कोमने शनिवारी होणाऱ्या अंतिम फेरीत जर सुवर्णपदक पटकाविले तर ती क्यूबाच्या फेलिक्स सैवाॅन याच्यांशी बरोबरी करेल.

पुरूष गटात क्यूबाई बाॅक्सिंगपटू सर्वात यशस्वी आहेत. सैवाॅनने तीन ऑलिम्पिक सुवर्णपदक जिंकले आहेत. याशिवाय जागतिक बाॅक्सिंग स्पर्धेत 1986 ते 1989 दरम्यान सहा सुवर्ण आणि एक रौप्यपदक जिंकले आहेत.


‘प्रभात’चे फेसबुक पेज लाईक करा

What is your reaction?
7 :thumbsup:
4 :heart:
0 :joy:
1 :heart_eyes:
0 :blush:
0 :cry:
0 :rage:

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)