मारुती सुझुकी कंपनीच्या कारही होणार महाग 

नवी दिल्ली: भारतातील सर्वात मोठी कार कंपनी मारुती सुझुकी या महिन्यात आपल्या विविध मॉडेलच्या दरात वाढ करणार आहे. कच्च्या मालाचे वाढलेले दर, रुपयाच्या अवमूल्यनामुळे सुट्या भागाची आयात महाग होत असल्यामुळे कंपनीला दरवाढ करावी लागत असल्याचे कंपनीचे कार्यकारी संचालक आर. एस. कलसी यांनी सिांगतले. ते म्हणाले की, इंधनाचे दर वाढल्यामुळे वाहतुकीचा खर्च वाढला आहे. त्याचाही कंपनीच्या उत्पादन मूल्यावर परिणाम होत आहे. काही कंपन्यांनी अगोदरच दरवाढ केली आहे.
आम्ही किती दरवाढ करायची यावर विचार करीत असल्याचे त्यांनी सांगितले. त्यांनी सांगितले की गेल्या काही आठवड्यांपासून आम्ही या शक्‍यतेवर विचार करीत आहोत. रुपयाच्या अवमूल्यनाचा आमच्यावर जास्त परिणाम होत आहे. नेमकी दरवाढ किती करणार असे विचारले असता ते म्हणाले की आमचा वित्त विभाग त्या विषयावर चर्चा करीत आहे. या महिन्यातच दरवाढ होणार असल्याचे त्यांनी स्पष्ट केले. याअगोदरच महिंद्रा आणि टाटा मोटर्स या कंपन्यांनी दरवाढ जाहीर गेली आहे. इतर कंपन्यांनीही दरवाढ करण्याचे संकेत अगोदरच
दिले आहेत.

‘प्रभात’चे फेसबुक पेज लाईक करा

What is your reaction?
0 :thumbsup: Thumbs up
0 :heart: Love
0 :joy: Joy
0 :heart_eyes: Awesome
0 :blush: Great
0 :cry: Sad
0 :rage: Angry
-Ads-

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)