‘मल्टी पर्पज व्हेईकल’ श्रेणीमधील मारुतीची एर्टिगा गाडी भारतीयांच्या खास पसंतीस उतरली होती. मारुतीने आता या ७ आसनी गाडीचे ‘एर्टिगा २०१८’ हे नवे मॉडेल बाजारामध्ये सादर केले असून यामध्ये अत्याधुनिक फीचर्स सहितच डिझाईन मध्ये देखील अपडेट्स देण्यात आल्या आहेत.
एर्टिगा २०१८ मॉडेल मध्ये आता प्रोजेक्टर सहित एलईडी टेल लॅम्स देण्यात आले आहेत. एर्टिगाचे हे नवे मॉडेल जुन्या मॉडेलपेक्षा आकाराने मोठे असून त्याच्या लांबी आणि रुंदीमध्ये वाढ करण्यात आली आहे. एर्टिगा २०१८ मॉडेलच्या इंटिरियर मध्ये देखील बदल करण्यात आले असून आता नव्या मॉडेल मध्ये एलईडी इन्फोएन्टरटेन्मेन्ट टचस्क्रीन, अँड्रॉइड व ऍपल कार प्ले, मागच्या सिट्ससाठी माऊंट इलेव्हेटेड एसी अशा अत्याधुनिक सुविधा देण्यात आल्या आहेत.
अत्याधुनिक सुविधांमुळे नवे मॉडेल ग्राहकांच्या पसंतीस पडण्याची शक्यता असली तरी मात्र नव्या मॉडेलमध्ये देखील व्हीलची साईझ जुन्या मॉडेल प्रमाणेच १५ इंचांची दिली असल्याने ही कदाचित नकारात्मक ठरू शकते.
नव्या एर्टिगाच्या पेट्रोल मॉडेलची किंमत ७.४४ लाखांपासून ९.९५ लाखांपर्यंत तर डिझेल मॉडेलची किंमत ८.८४ लाखांपासून ते १०.९० लाखांपर्यंत ठेवण्यात आली आहे.
‘प्रभात’चे फेसबुक पेज लाईक करा