मारुती सुझूकीच्या 6 हजार कारमध्ये आढळली खराबी

संग्रहित छायाचित्र...

नवी दिल्ली – मारुती सुझुकीच्या वाहनांतील सुपर कॅरी या मॉडेलमध्ये फ्युअल फिल्टरमध्ये बिघाड निर्माण झाला असल्यामुळे जवळपास 5 हजार 900 कार परत मागविण्यात येणार असल्याची घोषणा कंपनीकडून करण्यात आली आहे.

या कार ग्राहकांना विनामुल्य दुरुस्त करुन देणार असल्याचे कंपनीने सांगितले आहे. या समस्येची ग्राहकांना माहिती मिळावी म्हणून त्यांना डिजीटल माध्यामातून कळविले जाणार आहे. 26 एप्रिल 2018 ते 1 ऑगस्ट 2018 या कालावधीत या वाहनांची निर्मिती करण्यात आली आहे. त्याच दिवसांतील वाहन खरेदी केलेल्या ग्राहकांना संबंधीत बिघाड दुरुस्त करुन देण्यात येणार आहे.

-Ads-
दैनिक प्रभातचे फेसबुक पेज लाईक करा

त्यासाठी संबंधीत ग्राहकांनी कंपनीच्या वेबसाईटवरुन वाहनांचा चेसिस क्रमांक टाईप करुन इतर आवश्‍यक माहिती भरुन आपले वाहन दुरुस्तीसाठी शोरुमध्ये भरती करु शकता.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)