26 वर्षाच्या गायिकेचे 68 वर्षीय ऍक्‍टरबरोबर विवाह

हॉलिवूडची आघाडीची गायिका आणि अभिनेत्री सलीना गोमेझ अलिकडे एका वेगळ्याच कारणामुळे चर्चेत आली आहे. तिने कान फेस्टिव्हलच्या रेड कार्पेटवरचे काही निवडक फोटो सोशल मिडीयावर शेअर केले आहेत. या फोटोंच्या कॅप्शनमध्ये तिने एका धक्कादायक बातमीची घोषणा केली आहे.

हॉलिवूडमधील 68 वर्षीय ऍक्‍टर बिल मुरेबरोबर ती लग्न करणार आहे. ही पोस्ट वाचल्यावर तिच्या चाहत्यांना आश्‍चर्याचा धक्का बसला नसता, तरच नवल. यांनी सोशल नेटवर्किंग साईटवर सलीनाला तऱ्हेतऱ्हेचे प्रश्‍न विचारून भंडावून सोडले.

मात्र सलीनाची कॅप्शन काळजीपूर्वक वाचली, तर तिने बिल मुरे यांच्या बरोबर लग्नाचा विषय अगदी गमतीने म्हटलेला होता. “द डॅड डोन्ट लाय’ या सिनेमामध्ये सलीना बिल मुरेबरोबर दिसणार आहे. याच संदर्भाने ती कान फेस्टिव्हलमध्ये सहभागी झाली होती.

बिल मुरेबरोबर एकाच सिनेमात काम करण्यसाठी आपण आता तयार आहोत, असे लिहीताना सलीनाने गमतीने बिल मुरेबरोबर लग्न करायला तयार आहे, असे लिहीले होते. तिने आपल्या गमतीचे स्पष्टिकरण दिले, पण तोपर्यंत तिच्य चाहत्यंचा जीव टांगणीला लागला होता.

Ads

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)