पुणे – महाराष्ट्र दिन आणि कामगार दिनानिमित्त बुधवारी (दि. 1 मे) मार्केट यार्ड बंद राहणार आहे.
पुणे कृषी उत्पन्न बाजार समितीचे मुख्य कार्यालय, मुख्य बाजार आवारातील फुले, फळे, भाजीपाला, गुळ-भुसार, पान, केळी आदी बाजारांसह पेट्रोलपंप विभाग, भुईकाटा विभाग याखेरीज खडकी, उत्तमनगर आणि मांजरी हे उपबाजार बंद राहणार आहे. त्यामुळे शेतकऱ्यांनी शेतीमाल विक्रीसाठी बाजारात आणू नये, असे आवाहन बाजार समिती प्रशासनाच्या वतीने करण्यात आले आहे.