बाजारावर “गुलाबी’ रंग..

व्हॅलेनर्टान डेच्या पार्श्‍वभूमीवर लाखावर डच गुलाबांची विक्री


20 फुलांची गड्डी मिळतेय तब्बल 230 रुपयांना


पॉलिहाऊसमधील गडद लाल फुलांना परदेशांतही मागणी

पुणे – प्रेमी युगलांचा उत्सव अशी ओळख असलेला व्हॅलेनटाइन डे अवघ्या काही दिवसांवर आला आहे. या पार्श्‍वभूमीवर मार्केट यार्डातील फुल बाजारात गुलाबाची उलाढाल वाढली आहे. मंगळवारी येथील बाजारात तब्बल 5 हजार 400 गड्ड्यांची आवक होऊन 1 लाखांहून अधिक डच गुलाबांची विक्री झाली. घाऊक बाजारात 20 फुलांच्या गड्डीस हंगामातील सर्वाधिक 230 रुपये भाव मिळाला.

येत्या गुरूवारी (दि. 14) व्हॅलेनटाईन डे आहे. या पार्श्‍वभूमीवर रविवारपासून (दि. 10)लाल डच आणि साध्या गुलाबांची आवक वाढल्याचे सांगून फूलबाजार आडते असोसिएशचे अध्यक्ष अरूण वीर म्हणाले, “यंदा आवकेच्या तुलनेत मागणी वाढल्यामुळे गुलाबाच्या भावात 15 ते 30 टक्‍क्‍यांनी वाढ झाली आहे. जिल्ह्यात पॉलिहाऊसमध्ये उत्पादित होणाऱ्या गडद लाल रंगाच्या फुलांना परदेशांतदेखील मागणी असते. यामुळे, निर्यात संपल्यानंतर देशांतर्गत बाजरपेठेत फुलांचा पुरवठा सुरू होतो. मार्केटयार्डात खेड शिवापूर, शिक्रापूर, मावळ, तळेगाव (दाभाडे) येथून फुलांची आवक होत असते. रविवारपर्यंत रोज सुमारे दीड ते अडीच हजार जुड्यांची आवक होत होती. मंगळवारपासून यामध्ये दुपटीने वाढ झाली आहे. बाजारात 50 ते 70 सेंमी. च्या फुलांना 210 ते 230 तर 40 सेमीला 150 ते 180 रुपये भाव आहे. तो व्हॅलेंटाईन डेच्या आदल्या दिवसांपर्यंत 250 रुपयांपर्यंत जाण्याची शक्‍यता आहे.’

-Ads-
दैनिक प्रभातचे फेसबुक पेज लाईक करा

सागर भोसले म्हणाले, “लाल गुलाबाच्या पुष्पगुच्छात वापरली जाणारी टॅटसची फुले मोठ्या प्रमाणात बाजारात दाखल होत आहे. मंगळवारी 700 ते 800 टॅटस फुलांच्या गड्डींची बाजारात आवक झाली. त्याच्या प्रत्येक गड्डीला 20 ते 30 रुपये भाव मिळाला. दरम्यान, शहराच्या फुलबाजारात दाखल झालेली ही फुले शहरासह गोवा, दिल्ली, हैदराबाद, प. बंगाल आदी ठिकाणी पार्सल स्वरुपात जात आहे.’

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)